Heeramandi History Sanjay Leela Bhansali  esakal
मनोरंजन

Heeramandi Series : काय आहे 'हिरामंडीचा' इतिहास? भन्साळींना झाला वेबसीरिज निर्मितीचा मोह

काळानुसार हिरामंडीमध्ये बदल होत गेला आणि ब्रिटिशांनी भारतात पाय रोवल्यानंतर हिरामंडीचा चेहरा बदलला.

सकाळ डिजिटल टीम

Heeramandi History Sanjay Leela Bhansali : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या बिग बजेट चित्रपटांसाठी ओळखले जातात. सध्या त्यांचा हिरामंडी नावाची मालिका सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा फर्स्ट लूक समोर आला. त्यानंतर हिरामंडी काय आहे याविषयी चर्चा रंगताना दिसत आहे. हिरामंडी हा ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत असून यासगळ्यात नेटकरी हिरामंडी नेमकं आहे तरी काय याचा शोध घेत आहेत.

हिरामंडीची गोष्ट आहे तरी काय?

हिरामंडी पाकिस्तानमधील लाहोर येथे असणारा रेड लाईट एरिया आहे. ज्याला शाही मोहल्ला यानावानं देखील ओळखले जाते. फाळणीपूर्वी हिरामंडीमधील वेश्यालय हे देशभरामध्ये प्रसिद्ध होतं. त्याला मोठा राजकीय, सामाजिक इतिहास असल्याचे सांगण्यात येते. मुगलांच्या काळात अफगाणिस्तान, उजबेकिस्तानमधून हिरामंडीमध्ये मुली वेश्याव्यवसायासाठी आणल्या जात. ती एक मोठी बाजारपेठ होती. त्याकाळात वेश्याव्यवसायाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिले जात होते. मुघलकाळात या व्यवसायाकडे सांस्कृतिक भूमिकेतून पाहिले गेले. राजा महाराजांचे मनोरंजन करण्यासाठी तो भाग प्रसिद्ध होता.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

काळानुसार हिरामंडीमध्ये बदल होत गेला आणि ब्रिटिशांनी भारतात पाय रोवल्यानंतर हिरामंडीचा चेहरा बदलला. इंग्रजांनी त्या हिरामंडीला वेश्यालय असं नाव दिलं. त्यानंतर मात्र हिरामंडीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलला. स्वातंत्र्यानंतर हिरामंडी पाहायला येणाऱ्यांसाठी सरकारनं वेगवेगळ्या प्रकारचे सुविधाही दिल्या होत्या. मात्र तिथे सुधारणा ऐवजी चित्र आणखी गंभीर होत गेल्याचे सांगण्यात येते.

हिरामंडी नाव कसं पडलं?

असं म्हटलं जातं की हिरामंडी हे नाव शिख महाराजा रणजित सिंह यांचे मंत्री हिरा सिंह डोंगरा यांच्या नावावरुन ठेवलं गेलं. हिरा सिंह यांनीच त्याठिकाणी धान्यबाजारपेठ वसवली होती. त्यानंतर ते ठिकाण हिरामंडी या नावानं ओळखलं गेलं. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा करण जोहरच्या कलंकमध्ये हिरांमंडीच्या नावाचा उल्लेख आला होता. त्यानंतर आता भन्साळी त्यावर चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे.

पहिल्यापेक्षा आता ठिकाणचं स्वरुप बदलल्याचे दिसून आले आहे. सध्या ती बाजारपेठ अन्य बाजारपेठांसारखीच दिसून येते. मात्र रात्रीनंतर हिरामंडीचं स्वरुप हे रेड एरियामध्ये कधी बदलून जाते हे कळत नाही. असे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train: आनंदाची बातमी! देशातील पहिली वंदे भारत स्लिपर ट्रेन रुळांवर लवकरच धावणार, अखेर रेल्वेकडून मान्यता

लोककल्याणाची गाथा आणि भक्तीचा वसा ! अभंग तुकाराम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, या तारखेला रिलीज होणार सिनेमा

Justice Suryakant India’s New Chief Justice : न्यायमूर्ती सूर्यकांत असणार भारताचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली - वर्षा गायकवाड

SCROLL FOR NEXT