Hema Malini Video Esakal
मनोरंजन

Hema Malini Video: चक्क मेट्रोत बसंती, रिक्षातूनही ड्रीम गर्लनं केला प्रवास, प्रवाशांना बसला शॉक..

Vaishali Patil

Hema Malini Video: सेलिब्रिटी म्हटलं तर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचीही चर्चा होते. त्यांची क्रेझ ही चाहत्यांमध्ये खुप असते. सार्वजनिक ठिकाणी फिरतांना कलाकार त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या खासगी वाहनातून प्रवास करतांना दिसतात.

सेलिब्रिटी हे सार्वजनिक वाहतूकीचा वापर करतात असं दृश्य क्वचितच दिसत. काहीवेळा कलाकार केवळ त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असं काहीस पब्लिसिटी स्टंट करतांना दिसतात. मात्र त्यांचीही बरिच चर्चा रंगते.

असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी मंगळवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसल्या, हेमा मालिनी यांना पाहून सर्वच लोक आश्चर्यचकित झाले.

याची माहिती खुद्द अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली. एका ट्विटमध्ये भाजप खासदार हेमा मालिनी यांनी लिहिले की, त्यांना कारने मुंबईचं उपनगर असलेल्या दहिसरला पोहोचण्यासाठी दोन तास लागले होते. प्रवासही बराच 'कंटाळवाणा' होता. त्यानंतर मी कारऐवजी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्ध्या तासात मी माझ्या ठिकाणी पोहोचलो.

अभिनेत्रीनंतर राजकारणी बनलेल्या हेमा मालिनी यांनी ट्विटरवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

त्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी गुलाबी शर्ट आणि पांढरी पँट घातली होती, त्या मुंबई मेट्रोमध्ये सहप्रवाशांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. मेट्रो राईडनंतर हेमा मालिनी यांनी आपला उरलेला प्रवास ऑटोमध्ये पूर्ण केला.

मेट्रोच्या अनुभवानंतर अभिनेत्रीने ऑटो राईडचाही आनंद घेतली. त्यांनी डीएन नगर ते जुहू अशी राईड केली. हेमा मालिनी यांनी लिहिले की, जेव्हा त्या त्यांच्या घरी ऑटोमधून उतरल्या तेव्हा सुरक्षा रक्षकही आश्चर्यचकित झाले. त्यांनी व्हिडिओसोबत पोस्ट केला. "हा व्हिडिओ मी ऑटोच्या आतून शूट केला आहे." मी स्वतः याचा खूप आनंद घेतला!”

हेमा मालिनी या उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच मथुरेच्या भाजप खासदार आणि एक कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना देखील आहेत.

त्या शेवटच्या 2020 मध्ये आलेल्या शिमला मिर्ची चित्रपटात दिसला होत्या. शोले, सीता और गीता, दिल्लगी, राजा जानी, दो दिशाएं, द बर्निंग ट्रेन, जुगनू, दिल का हीरा आणि ड्रीम गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनयासाठी त्या ओळखल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT