hemangi kavi on nonveg food sakal
मनोरंजन

कोकणातल्या माणसासोबत लग्न झालं आणि.. हेमांगी कवीने सांगितली..

अभिनेत्री हेमांगी कवी हिने तिच्या आयुष्यात लग्नानंतर काय बदल झाले हे सांगणारी पोस्ट लिहिली आहे.

नीलेश अडसूळ

Entertainment News : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. नुकताच तिने एक फोटो इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करत लग्नानंतर आयुष्यात काय बदल झाला याबद्दल सांगितले आहे.

या फोटोमध्ये हेमांगी (hemangi kavi) एका खास वेशभूषेत दिसत आहे. 'कोळी' संस्कृतीत नेसली जाणारी साडी यावेळी तिने परिधान केली आहे. एका डान्स साठी तिने ही वेशभूषा केली होती. पण हा फोटो पोस्ट करताना तिने आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'ही पोळी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद!' असे कॅप्शन देत तिने पोस्ट लिहिली आहे. 'लग्नाच्या आधी मी फार कमी, कमी म्हणजे नाहीतच जमा, मांसाहार करायचे, मधली ६ वर्ष तर मी अंड सुद्धा खाल्लं नव्हतं. इतकी vegetarian होते. पण मग पुढे लग्न झालं कोकणातल्या माणसासोबत आणि मग काय हळू हळू मांसाहार वाढत गेला. तेव्हावरील ओळी चपखल आपल्यासाठीच लिहिल्या आहेत असं वाटतं! असं vegetarian to non- vegetarian कोण कोण झालंय सांगा पाहू? बरं ते जाऊदे… आज कालवणास काय केलंय ते सांगा!”, असे तिने म्हटले आहे. हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी आपल्या खाण्याच्या आवडीबद्दल सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT