Hemangi Kavi shared post about her clothes women fashion and men's approach sakal
मनोरंजन

Hemangi Kavi: हेमांगी म्हणतेय, पुरुष सदस्यांनो माझी पोस्ट वाचू नका अन्यथा तुमचा रविवार खराब होऊ शकतो..

अभिनेत्री हेमांगी कवीची खास पोस्ट चर्चेत..

नीलेश अडसूळ

hemangi kavi : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नावं आहे. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते.

ती अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. प्रत्येक विषयावर आपलं रोखठोक मत ती मांडत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सतत काहीना काही पोस्ट करत असते, रील टाकत असते. आज मात्र तिने चक्क कपडे आणि फॅशन हा विषय निवडला आहे.

कारण महिलांना, मुलींना फॅशनची आवड असते, किती कपडे असले तरी आपल्याकडे अजून चार जोड असावेत असं वाटत असतं. पण आज त्याच विषयावर हेमांगीने तिचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे. आणि पुरुषांना एक सल्लाही दिला आहे.

(Hemangi Kavi shared post about her clothes women fashion and men's approach)

हेमांगी म्हणते, '' जेव्हा तुम्हाला फारसे कपडे खरेदी करावेसे वाटणार नाही तेव्हा तुम्ही समजूतदार झाले आहात असं समजायचं.. हे विधान थोडं विचित्र आहे पण खरंय! मी २०२० आणि २०२१ पुर्ण २ वर्ष कपड्यांचं बिलकुल शॉपिंग केलं नाही. एकतर लॉकडाउन चालू होता, दुसरं म्हणजे त्याच काळात उमगलं की कपड्यांवर खुपच खर्च होतो आणि तिसरं म्हणजे माझ्यात फार मोठे शारीरिक बदल होत नसल्यामुळे कपड्यांचा ढीग साचतोय आणि कपाट कमी पडतंय.''

''माझ्याकडे १५-२० वर्षांपासूनचे कपडे अजूनही चांगल्या condition मध्ये आहेत आणि मी ते वापरते. काही माझ्या भाच्यांना देते. काही mix match करत वापरते. आता इतकी वर्ष हे कपडे टिकतात कसे तर एक म्हणजे कपडे नीट वापरायची, जपून धुवायची शिस्त आणि दुसरं म्हणजे या कला क्षेत्रात काम केल्याच्या अनेक फायद्यांमध्ये शूटिंग सेट, नाटकातले कपडे दिवसभर घातल्यामुळे आमच्या वैयक्तिक कपड्यांचा कमीत कमी वापर.''

''पण आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात (खासकरून महीलांसाठी) तरी सोशल मीडिया मुळे एकदा का एका आऊट फिट वर तुम्ही एखादा फोटो पोस्ट केला की झालं परत तो वापरायचा नाही असा एक अलिखित नियम रूढ होतोय. आणि मी या नियमातून स्वतःला मुक्त केलंय. मी कपडे रिपीट करते. त्यावरचे फोटोही पोस्ट करते. बिनधास्त.''

हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुढे ती (hemangi kavi) म्हणाली आहे, ''काही आगाऊ लोकं कमेंट मध्ये त्यांच्या बारीक निरीक्षणाची आणि बेरकी स्वभावाची पावती देतात पण त्याने मला फरक पडत नाही. आता मी ४-५ महीन्यातून एकदा खरेदी करते. खरंच खुप बरं वाटतं. हलकं वाटतं.''

''या post मधून देशा समोर उभे असलेले प्रॉब्लेम सोल्व होणार नाहीएत किंवा या माझ्या आत्मज्ञानाने तुम्हांला काही एक फायदा होणार नाहीए हे मला माहितीए पण मला शेयर करावंसं वाटलं म्हणून केलं. आता मला ती maturity गाठायची आहे जेव्हा हे असलं काही शेयर करणं ही निरर्थक वाटू लागेल!'' असं हेमांगी म्हणाली आहे.

''एवढेच नाही तर तिने पुरुषांसाठी एक तळटीप दिली आहे. हेमांगी म्हणते, ''मंडळातील पुरूष सदस्यांनी लगेच आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या, घरातल्या, बाहेरच्या, ऑनलाइनच्या, ऑफलाइनच्या स्रियांना ‘शॉपिंग कसं करू नये’ याचं उत्तम उदाहरण म्हणून ही पोस्ट वाचून दाखवू किंवा पाठवू नये अन्यथा तुमचा रविवार खराब होण्याची शक्यता उद्भवेल!'' असं ती म्हणाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : दादर रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त, पालिका-पोलीस संयुक्त धडक कारवाई

SCROLL FOR NEXT