Phakat, Phakat teaser, Phakat teaser news, hemant dhome, suyog gorhe, avinash narkar SAKAL
मनोरंजन

Phakaat Trailer: LOC ची फाईल लागणार पाकिस्तानच्या हाती..? शहीद जवानांची बाजू मांडणारा 'फकाट'

श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे

Devendra Jadhav

सध्या मराठी सिनेसृष्टीत चर्चा आहे ती 'फकाट' सिनेमाची.. धमाकेदार गाणी आणि भन्नाट टिझर प्रदर्शित झाल्यानंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे.

श्रेयश जाधव त्यांच्या प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी हटके विषय घेऊन येतात. आता 'फकाट' सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलाय.

(hemant dhome, suyog gorhe starrer phakaat movie trailer out now)

ट्रेलरमध्ये भारत -पाक युद्ध, विनोद, प्रेम असे सगळेच पाहायला मिळत आहे. एलओसी सारखा गंभीर विषय असतानाच हेमंत ढोमे आणि सुयोग गोऱ्हे यांची धमालही दिसतेय.

घरच्यांनी आणि या दोघांनीही आपण काहीच करू शकत नसल्याची आशा सोडल्यानंतर अचानक हेमंत आणि सुयोगच्या हाती एक हायली कॅान्फिडेन्शिअल फाईल लागते आणि त्यानंतर ते त्या फाईलची काय विल्हेवाट लावतात,

यादरम्यान त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यानंतर जो धिंगाणा होतो तो ‘फकाट’मध्ये पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरमध्ये अभिजीत खांडकेकर याचीही झलक दिसत आहे. त्यामुळे आता त्याची यात काय भूमिका आहे, हे ‘फकाट’ पाहिल्यावरच कळेल.

'फकाट'च्या निमित्ताने कबीर दुहान सिंग मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तो नकारात्मक भूमिकेत दिसत असून त्याचा एक वेगळाच दरारा या चित्रपटात दिसत आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, ‘’ हा एक धमाल मनोरंजन करणारा चित्रपट असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे. चित्रपटात या कलाकारांनी जो धिंगाणा घातला आहे, तो कमाल आहे.

‘फकाट’ विनोदी असला तरी यातून एक छान संदेशही देण्यात आला आहे. यात भारत पाकिस्तानचा संदर्भ आहे, मात्र कोणच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींना आवडतील अशीच आहेत.''

चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा सुद्धा एक वेगळाच चित्रपट असल्याचे दिसतेय. वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित या चित्रपटात

हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनिल, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘फकाट’ येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आचारसंहितेच्या धास्तीने निविदा मंजुरीसाठी धडपड; ४०० कोटीच्या कामाचे प्रस्ताव मंजूर

Hockey India League : नवनीत कौर आणि जर्मनप्रीत सिंग करणार एसजी पायपर्सचे नेतृत्व; उपकर्णधारांचीही घोषणा

मोठी बातमी! शाळा बंद आंदोलनातही सुरू होत्या २१६२ शाळा; सोलापूर जिल्ह्यातील १७,८०० शिक्षक शाळा बंद आंदोलनासून राहिले दूर

Mumbai Crime: व्हिसा नसताना भारतात आला, 72 लाखांच्या कोकेनसह पोलिसांनी पकडला

Mephedrone Seized : हडपसरमध्ये मेफेड्रोन विक्री करणाऱ्यास अटक, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT