मनोरंजन

ग्रामस्थांचा विराेध झुगारुन "माझी आई काळुबाई' चित्रीकरण ठेवले हाेते सुरु

अमाेल काकडे

तरडगाव (जि. सातारा) : "माझी आई काळुबाई' या मालिकेच्या चित्रिकरणास जिल्हा प्रशासनाने नियमांचे बंधन घालून दिली होती. त्यानूसार सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी चित्रिकरण झाले. परंतु हिंगणगाव (ता. फलटण) येथील चित्रिकरण पाहण्यास माेठ्या प्रमाणात गर्दी हाेऊ लागल्याने स्थानिकांनी विराेध दर्शविण्यास प्रारंभ केला. त्यातूनच हिंगणगाव ग्रामपंचायतीने चित्रिकरण आयाेजकांना नाेटीस बजावली हाेती.

"माझी आई काळुबाई' या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे काेविड 19 मुळे सातारा येथील एका रुग्णालयात आज (मंगळवार) पहाटे निधन झाले. गेल्या दोन महिन्यापासून हिंगणगाव (ता. फलटण) येथील खानविलकर फॉर्महाऊस येथे चित्रिकरण सुरू होते. येथे सर्व कलाकार सेटवरील इतर कलाकार वास्तव्यास होते. सुरुवातीपासूनच या मालिका चित्रीकरणासाठी हिंगणगाव ग्रामस्थांचा विरोध होता. मागील आठवड्यातच हिंगणगाव ग्रामपंचायतीने कोरोना संदर्भातील आचारसंहितेचे पालन होत नाही, त्यामुळे चित्रीकरण बंद करावे असे लेखी बजावले हाेते. त्याकडे मालिका चित्रिकरण करणाऱ्या आयोजकांनी दुर्लक्ष करत चित्रिकरण तसेच पुढे चालू ठेवले.

प्रतिसरकार चळवळीतील शेवटचा दुवा निखळला; सोपानराव घोरपडे यांचे निधन

या खानविलकर फार्म जवळच धनगरवाडा याठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी कोणतीही परवानगी न घेता चित्रिकरण केले होते. याबाबत कोरोना संदर्भातील गावपातळीवरील समितीने संबंधितांना विचारले असता त्यांना कोणत्याही प्रकारची उत्तरे चित्रिकरणाच्या संचालकांना दिली नाहीत.

आशालता वाबगावकर यांचा गायिका ते नायिका एक यशस्वी जीवनप्रवास

तुम्ही येथे चित्रिकरण करू नका, सोशल डिस्टसिंगचे पालन होत नाही. चित्रिकरण बघायला येणाऱ्यांची गर्दी होत असून ही गर्दीही आटोक्‍यात येत नाही, असे समितीने सांगितले होते. पण या सूचनेकडे चित्रिकरण आयोजकांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा गावात हाेत आहे. दरम्यान नियमांना तिलांजली दिल्यानेच कोरोनाचा शिरकाव होऊन कलाकारांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. आता तर तब्बल 27 कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समाेर येताच हिंगणगावमध्ये घबराट पसरली आहे.

नरेंद्र माेदींना कोरोना, चीनप्रश्‍न हाताळता आला नाही : पृथ्वीराज चव्हाण 


खानविलकर फार्म व संबंधित चित्रीकरणाच्या संचालकांना मागील आठवड्यात हिंगणगाव ग्रामपंचायतीने नोटीस दिली होती. त्याची कोणतीही दखल न घेतल्याने व कोरोनाच्या आचारसंहितेचे पालन न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. हिंगणगाव ग्रामस्थ व आजूबाजूच्या परिसरांतून चित्रीकरण पाहण्यास येणारे लोकही आता भयभीत झाले आहेत. 

- जयदीप ढमाळ (माजी उपसरपंच, कोरोना समिती सदस्य, हिंगणगाव, ता. फलटण)

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT