HM Amit Shah attends Samrat Prithviraj screening Google
मनोरंजन

सम्राट पृथ्वीराज पाहून अमित शाह यांना सुचला विनोद, पत्नीला चिडवत म्हणाले...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पत्नीसोबत या 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग पहायला १जून,२०२२ रोजी गेले होते.

प्रणाली मोरे

अक्षय कुमारचा(Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) सिनेमा येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. १ जून रोजी या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग(Special Screening) ठेवण्यात आलं होतं. गृह मंत्री अमित शहा(Home Minister Amit Shah) पत्नीसोबत या सिनेमाचं स्क्रीनिंग पहायला गेले होते. 'सम्राट पृथ्वीराज' पाहून अमित शहा खूप खूश झाले. त्यांनी केवळ सिनेमातील कलाकार, क्रु मेंबर्सची प्रशंसा केली नाही तर त्यांना सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा देखील दिल्या. परंतु जेव्हा सिनेमा संपल्यावर परत जायला ते निघाले तेव्हा त्यांनी आपली पत्नी सोनल हिला 'चलिए हुकूम' म्हणत आवाज दिला. चला,जाणून घेऊया नेमकं काय झालं त्याविषयी.

अमित शाह यांनी 'सम्राट पृथ्वीराज' पाहिल्यानंतर सिनेमाची प्रशंसा केली आणि सांगितलं की, ''तब्बल १३ वर्षांनी मी कुटुंबासोबत थिएटरमध्ये सिनेमा पहायला आलो आहे''. अमित शाह पुढे म्हणाले की,''भारत गेल्या अनेक दशकांपासून बाहेरच्या देशांच्या आक्रमणांचा,विरोधकांचा सामना करत आला आहे. १२ व्या शतकातल्या 'राजा पृथ्वीराज' यांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी,देशाच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी लढा दिला आहे. जे लोक महिलांप्रती असलेल्या अधिकारांचं समर्थन करतात त्यांनी हा सिनेमा नक्की पहावा''.

अमित शाह सिनेमावर प्रतिक्रिया दिल्यानंतर जेव्हा बाहेर पडण्यासाठी चालायला लागले तेव्हा त्यांच्या पुढे पत्नी सोनल उभ्या होत्या. सोनल यांना तेव्हा समजलं नाही की नेमकं कोणत्या रस्त्यानं थिएटर बाहेर पडायचं आहे. तेव्हा मागून येणाऱ्या अमित शाह यांनी चक्क पत्नीला 'चलिए हुकुम' म्हणत ऐतिहासिक अंदाजात हाक मारली. 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमातील व्यक्तिरेखा ज्या अंदाजात बोलताना दिसल्या त्याच अंदाजात अमित शाह यांनी पत्नीला हाक मारल्यानं उपस्थितांमध्ये मात्र हशा पिकला.

सम्राट पृथ्वीराज मध्ये अक्षय कुमार सोबत मानुषी छिल्लर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच,सोनू सूद आणि संजय दत्त देखील या सिनेमात दिसणार आहेत. अक्षय कुमार नुकताच या सिनेमाच्या प्रमोशन साठी बनारस ला गेला होता. हा सिनेमा अनेक वादांमुळे चर्चेत देखील राहिला आहे. आता पहायचं की अक्षय कुमार पृथ्वीराज बनून बॉक्सऑफिसवर आपल्या अभिनयाच्या जादून लोकांच्या मनात कसं स्थान मिळवतो .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT