saba azad hritik roshan girlfriend React on troll and Comment Like Mad after her dance and singing video viral  Esakal
मनोरंजन

Saba Azad Video: "तुला थेरपीची गरज" म्हणणाऱ्या ट्रोलर्सला सबानं दिलं जबराट उत्तर म्हणाली...

Saba gave a strong reply to the trolls who said "you need therapy"...

Vaishali Patil

Saba Azad Video: हृतिक रोशन सध्या त्याच्या फायटर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हृतिक हा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. मात्र कालपासून सोशल मीडियावर त्याच्यापेक्षा जास्त चर्चा त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझाद हिच्या नावाची होती.

सबा आझादचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे ती अचानक चर्चेत आली. या व्हायरल व्हिडिओमध्ये सबा रॅम्पवर नाचताना आणि गाताना दिसतेय. सबा त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसली मात्र नेटकऱ्यांना ही गोष्ट काही पटली नाही. त्यांनी सबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी सबानं देखील ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली.

दिल्लीत आयोजित एका फॅशन शोदरम्यान सबा आझाद रॅम्प वॉक करताना दिसली. तिने स्टायलिश गोल्डन कलरचा को-ऑर्ड्स सूट परिधान केला होता. सबा एक अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम गायक देखील आहे.

रॅम्प वॉक करताना ती तिच्याच तालात नाचत आणि गाणं गात होती. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. "तूला थेरपीची गरज आहे. तू वेडी झाली आहेस का? तिला झटके येत आहेत का?" अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओला आल्यात. आता सबानं देखील ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला.

सबाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले. यात एका यूजरने तिला 'तुला थेरपीची गरज आहे' असा सल्ला तिला दिला होता.

यावर सबाने लिहिले, 'हो, सर/मॅडम!! मी सहमत आहे आणि मी ते नियमितपणे घेते, आपल्यासारख्या द्वेषाने भरलेल्या जगात प्रत्येकाने हे केले पाहिजे. त्यामुळे तुमच्या जखमा भरून काढण्यास मदत होते. अशा प्रकारे इतरांच्या शांततापूर्ण आयुष्याला दुखावू नका.

Saba Azad React To Comment
Saba Azad React To Comment

सबा आझादने आणखी एका युजरच्या कमेंटला उत्तर दिले ज्याने सबाला "वेडी आहे का?" असं लिहिलं होतं. यावर सबाने लिहिले, 'हो जफर!! मी खरंच असं असायला हवं, दररोज द्वेषाला माझ्या वाटेवर पाठवलं जातं आणि मला कदाचित आजचा दिवस चांगला जाईल असा विचार करत हसत हसत पुढे जावं लागते. मी वेडी व्हायला हवं कारण कदाचित तुमच्यासारख्या लोकांसाठी जग खरंच तसं नाही. हा तुमचा वारसा आहे, जो तुम्ही मागे सोडणार आहात'. सध्या सबाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमुळे देखील सबा आझाद अनेकदा ट्रोल झाली आहे. मात्र सबावर या ट्रोलिंगचा काही परिणाम होत नाही. ती ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सबाची 'हू इज युअर गायनेक' ही सिरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT