Hruta Durgule And Prathamesh Parab Timepass 3 Movie-Read Good News About Movie Instagram
मनोरंजन

'Timepass 3' च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा; जाणून घ्या Good News...

हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या टाईमपास ३ सिनेमानं बॉक्सऑफिसवरही कोटींचा गल्ला जमवत प्रेक्षकांची उत्तम दाद मिळवली आहे.

प्रणाली मोरे

Timepass 3: गेल्या काही दिवसांपासूनच ‘टाईमपास ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे. दगडू आणि पालवीच्या प्रेमकहाणीने मराठी पडद्यावर वेगळीच रंगत आणली आहे. 'आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ’, ‘हम गरीब हुए तो क्या हुआ’ या अनेक हिट संवादाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘टाईमपास’.(Hruta Durgule And Prathamesh Parab Timepass 3 Movie-Read Good News About Movie)

जेवढं प्रेम टाईमपासच्या पहिल्या दोन भागांना मिळाले आता त्याहुनही जास्त प्रेम प्रेक्षक 'टाईमपास ३' ला देताना दिसत आहेत.'टाईमपास ३' च्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. त्यातच सोने पे सुहागा म्हणजे नुकतेच जाहीर झालेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ मध्ये ‘टाईमपास ३’च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता- प्रथमेश परब, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ह्रता दुर्गुळे, (Hruta Durgule) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- रवी जाधव,सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अन्विता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय नार्वेकर, सर्वोत्कृष्ट गायक अमितराज (कोल्डड्रिंक) यांना ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ मध्ये नामांकने प्राप्त झाली आहेत.

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास ३’ चित्रपटात ह्रता दुर्गुळे,प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले,संजय नार्वेकर इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT