Sharad Ponkshe esakal
मनोरंजन

Sharad Ponkshe : ..तरच देशात मुस्लिम सुखाने राहतील; शरद पोंक्षेंचा नेमका कोणाला इशारा?

हिंदू हा जगातील सर्वात सुंदर आणि सर्वश्रेष्ठ व एकमेव धर्म आहे.

सकाळ डिजिटल टीम

तलवारीच्या धारेवर धर्मांतर करणारे टिपू सुलतान, औरंगजेब, अकबर हे देशाचे अजिबात नायक होऊ शकत नाहीत.

इचलकरंजी : ‘भारत देशात मतपेट्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी बहुसंख्याकांचा वारंवार अपमान केला जात आहे. हिंदू धर्मात गेल्या काही वर्षांपासून फूट पाडण्याचे कारस्थान केले जात आहे. त्यापासून सावध होण्याची गरज आहे.

भारत हिंदू राष्ट्र झाले तर मुस्लिम (Muslim) अधिक सुखाने राहतील’, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी केले. येथील शिवराणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित हिंदू जागरण सभेत (Hindu Jagran Sabha) प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

पोंक्षे म्हणाले, ‘हिंदू हा जगातील सर्वात सुंदर आणि सर्वश्रेष्ठ व एकमेव धर्म आहे. स्वातंत्र्यांची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी देशातील हिंदुत्व बाल्यावस्थेत असून रांगण्याच्या स्थितीत आहे. मुळात हिंदू धर्म हा प्रत्येकाशी माणुसकीने व प्रेमाने वागविण्यास शिकवतो. विश्वाची निर्मिती हीच हिंदू धर्माची स्थापना आहे. सध्या जगभर धर्म आणि अधर्माच्या लढाया होत आहेत.'

हिंदू बहुसंख्याकांमुळेच इतर धर्मीय भारतात सुखाने नांदत आहेत. हेच तत्त्व जगभरातील मानवजातीसाठी सुखकारक आहेत. मुळात हिंदू धर्म हा काळानुरुप बदलत गेला आहे. अनेक अनिष्ट चालीरीती हिंदू धर्माने सोडून दिल्या आहेत. हिंदुत्ववादी म्हणजे मुस्लिमविरोधी हा गैरसमज निर्माण करण्यात आला आहे.’

स्वागत आकाश शिंदे यांनी केले. संस्थेची माहिती शरद भुतडा यांनी दिली. पोंक्षे यांचा परिचय श्रीशैल्य देसाई यांनी करून दिला. पोंक्षे यांचा यावेळी मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन अरविंद कुलकर्णी यांनी केले. निवेदन अजिंक्य गोडसे यांनी केले. रोहन हेरलगे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. खबरदारी म्हणून नाट्यगृहात परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

... त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा

सभेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना पोंक्षे म्हणाले,‘ हिंदू राष्ट्रात मुघल व ब्रिटिश शासकांचे उदात्तीकरण होणे ही अपमानास्पद बाब आहे. तलवारीच्या धारेवर धर्मांतर करणारे टिपू सुलतान, औरंगजेब, अकबर हे देशाचे अजिबात नायक होऊ शकत नाहीत. त्यामुळे छत्रपतींच्या राज्यात अशांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. काही दिवसांपासून काही ठिकाणी औरंगजेब, टिपू सुलतान यांचे जाहीरपणे फलक झळकावले जात आहेत. राक्षसी शासकांचे उदात्तीकरण करणारी ही मानसिकता, अपप्रवृत्ती हाणून पाडणे गरजेचे आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT