Ileana D’Cruz Google
मनोरंजन

सुशांत नंतर आता इलियाना डीक्रुजच्या मनात आत्महत्येचे विचार; कारणही सांगितलं

रणबीर कपूर ते अक्षय कुमार अशा बड्या हिरोंसोबत सुपरहिट सिनेमात दिसलेल्या इलियानाच्या मनात आत्महत्येचे विचार का आले असा प्रश्न सध्या उद्भवला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड (Billywood)अभिनेत्री इलियाना डीक्रूज( Ileana D’Cruz)काही दिवसांपूर्वी तिच्या शरीराच्या आकाराच्या समस्येवरनं खूप त्रासली होती. तिला त्यावरनं ट्रोलही केलं गेलं होतं. आणि त्या विषयावर तिनं समोरुन बोलून स्पष्टिकरणही दिलं होतं. पण नुकताच तिनं खुलासा केलाय की तिच्या आयुष्यात शरीराच्या आकाराच्या समस्येवरुन ती टेन्शनमध्ये असतानाच अचानक आत्महत्या करावी असंदेखील तिला वाटत होतं. पण बॉडी शेमिंगचा आणि आत्महत्येच्या विचारांचं एकमेकांशी काही कनेक्शन नाही असं तिनं स्पष्ट केलं आहे.

ती म्हणाली,''मी माझ्याविषयी छापून आलेलं एक आर्टिकल वाचलं,ज्यात लिहिलं होतं इलियाना शरीराच्या आकाराच्या समस्येवरुन त्रासली आहे त्यामुळे तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊन भलतंच काही तरी लिहिलं गेलं होतं''. ती पुढे म्हणाली,''खरंतर ते आर्टिकल वाचून माझ्या मनात आत्महत्या करावी का काय करावं असे विचार येऊन गेले होते''.

इलियाना वयाच्या १२ व्या वर्षापासून तिच्या कमरेखालच्या शरीराच्या थोड्या विचित्र आकाराच्या समस्येचा सामना करीत आहे. तिनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली,'' माझ्या आयुष्यात मला एकदा आत्महत्या खरंच करावी का असा विचार डोकावून गेला पण तो माझ्या शरीराच्या आकारामुळे नाही तर एका वेगळ्या खूप नाजूक गोष्टीमुळे जी माझ्यासोबत घडली होती. शरीराची समस्या आणि आत्महत्येचे विचार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा लोक दोन वेगळ्या गोष्टींना ओढूनताणून एकत्र आणतात तेव्हा खरंच खूप त्रास होतो. माझ्याबाबतीत ते झालंय''.

इलियानानं काही दिवसांपूर्वी रेड बिकीनीतले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आणि तिनं लिहिलं होतं,''मी जी आहे ती अशी आहे. माझी बॉडी किती परफेक्ट आहे,मी किती स्लिम आहे हे दाखवण्यासाठी मला कुठल्याही अॅपची गरज नाही. उगाचच कुठल्यातरी अॅपनं आपल्या बॉडीला शेपमध्ये दाखवणं मला पटत नाही...'' अशी पोस्ट तिनं लिहीली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा

Mumbai News : रोषणाईपासून बससेवेपर्यंत… गणेशोत्सवासाठी बेस्टची फुल तयारी

Crime News : नागा साधूच्या वेशात फसवणूक; नाशिकमध्ये संमोहन करून अंगठी व रोकड लंपास

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

SCROLL FOR NEXT