India's Laughter champion Tv Anchor Parizad Kolah Injured Instagram
मनोरंजन

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध निवेदिका परिझाद कोलाह अपघातात गंभीर जखमी

'इंडियाज लाफ्टर चॅंपियन' हा कॉमेडी शो लवकरच सुरु होणार होता. पण आता शो ची Anchor जखमी झाल्यानं शूटिंग कॅन्सल केल्याचं बोललं जातंय.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावर(T.V) लवकरच सुरु होणाऱ्या 'इंडियाज लाफ्टर चॅपियन'(India's Laughter Champion) या कॉमेडी शो(Commedy Show) प्रति प्रेक्षकांमध्ये भलताच उत्साह पहायला मिळत आहे. या कार्यक्रमाच्या परिक्षकांच्या भूमिकेत अर्चना पुराण सिंग आणि शेखर सुमन असणार आहेत. त्यामुळे देखील लोक शो ची प्रतिक्षा करताना दिसत आहेत. या शो ची प्रसिद्ध निवेदिका परिझाद कोलाह देखील काही दिवसांपूर्वी या शो संदर्भात खूप उत्साहाने बोलताना दिसली होती. शो च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे पण परिझाद मात्र अजून काही दिवस शूटिंग करु शकणार नाही अशी बातमी कानावर पडतेय. बोललं जात आहे की परिझादचा अपघात झाला आहे आणि त्यात तिच्या पायाला खूप लागलं आहे.

यासंदर्भात स्वतः परिझादनं माहिती देत सांगितलं आहे की,''मी कॅमेऱ्यासमोर परत जोशात काम करण्यासाठी खूप उत्सुक होते. 'इंडियाज लाफ्टर चॅंपियन' सारख्या शो चा कॉमेडी जॉनर मला नेहमीच आवडतो. पण माझं दुर्भाग्य,मी खूप वाईट पद्धतीनं पडली आहे आणि ज्यामुळे माझ्या पायाला जबरदस्त मार लागला आहे. छोट्या पडद्यावर पुन्हा एन्ट्री घेण्यासाठी आता मला आणखी थोडं वाट पहावं लागेल. पण मी आशा करते की मी लवकरच परत माझ्या कामाला सुरुवात करेन''.

मिळालेल्या माहितीनुसार,परिझादला डॉक्टरांनी सध्या पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तिला टोटल बेडरेस्ट असंच सूचित केलं गेलं आहे. पायाला झालेली दुखापत व्यवस्थित काळजी घेत,आराम केला तरच लवकर बरी होईल अंस तिला सांगण्यात आले आहे. २००७ मध्ये परिझादने 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' मध्ये एन्ट्री केली होती. त्या दिवसांत शो चे परिक्षक म्हणून शेखर सुमन आणि नवज्योत सिंग सिद्धू काम पहायचे. सिद्धू त्यानंतर 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेले आणि मग नंतर राजकारणात गेल्यानंतर अर्चना पुराण सिंग त्या जागी विराजमान झाली.

'इंडियाज लाफ्टर चॅंपियन' या शो ची घोषणा सोनी टि.व्हीने आपला सर्वात हिट कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' च्या या सिझनमधील शेवटचा भाग शूट केल्यानंतरच केली होती. कपिलच्या शो च्या जागी 'इंडियाज लाफ्टर चॅंपियन शो' सुरु होणार आहे. सध्या पूर्ण देशात या शो च्या ऑडिशन सुरू झाल्या आहेत. एका मुलाखतीत या संदर्भात बोलताना अर्चना पुराण सिंग म्हणाल्या होत्या, ''या शो च्या माध्यमातून आम्ही देशातला नवा कपिल शर्मा शोधणार आहोत. खूप वर्ष झाली देशाला कुणी नवीन स्टॅंड अप कॉमेडियन मिळाला नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : एका सक्षम पथकाची नियुक्ती केली आहे आणि सखोल चौकशी सुरू आहे - अहिर

SCROLL FOR NEXT