Is Ranbir Kapoor planning to join Hollywood?  Instagram
मनोरंजन

हॉलीवूड सिनेमात रणबीर कपूरचं पदार्पण? अभिनेत्यानं दिलं मन जिंकणारं उत्तर...

रणबीर कपूर हॉलीवूड मध्ये पदार्पण करतोय अशी चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती त्यावर अभिनेत्यानं आता चुप्पी तोडली आहे.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) हा नपोटिझमचा प्रॉडक्ट नाही हे आपण सारे प्रेक्षक म्हणून नक्कीच छातीठोकपणे सांगू शकतो. त्यानं केवळ दिसण्यानं नाही तर आपल्या अभिनयानं देखील अनेक चाहत्यांच्या मनावर आपलं नाव कोरलं आहे. आलियाशी लग्न करून त्यानं अनेक मुलींचं मन भले तोडलं असलं तरी प्रत्येकजण आपल्या या लाडक्या अभिनेत्याच्या यशासाठी मात्र नेहमीच चांगलं चिंतन करताना दिसतो. आता सर्वांच्या या लाडक्या अभिनेत्याच्या बाबतीत एक बातमी कानावर पडतेय ती म्हणजे आपला रणबीर कपूर हॉलीवूडला(Hollywood Debue) चालला आहे. आता बायकोला हॉलीवूडचं निमंत्रण मिळाल्यानंतर आपल्यालाही बोलावणं आलंय म्हटल्यावर रणबीरची स्वारी खुशीत हवी नाही का. चला जाणून घेऊया गेल्या काही दिवसांपासून रणबीरच्या हॉलीवूड पदार्पणाच्या बातम्यांवर स्वतः अभिनेता काय म्हणाला आहे ते?(Is Ranbir Kapoor planning to join Hollywood?)

रणबीर म्हणाला,''तिथं ऑडिशन होतात,आणि मला ऑडिशनची भिती वाटते खासकरुन हॉलीवूडमधील तर जरा जास्तच. त्यामुळे त्याचा हॉलीवूड सिनेमात काम करण्याचा काहीच प्लॅन नाही. आणि हॉलीवूडमध्ये काम करायचं माझं स्वप्न कधीच नव्हतं'', हे देखील रणबीरनं आपल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. पुढे रणबीर म्हणाला, ''मी आता जिथे काम करतोय त्यात आनंदी आहे आणि आता 'ब्रह्मास्त्र' हीट होण्याची मी खूप स्वप्न पाहिली आहेत. जर तुम्हाला जगभरातील प्रेक्षकांशी संवाद साधायचाय तर तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत काम करुनही साध्य करू शकता. मला वाटतं आपल्या मातीतली कथा,संस्कृती,परंपरा जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करु शकते एवढी ताकद तिच्यात आहे''.

रणबीर कपूर सध्या प्रतिक्षा करतोय ते त्याच्या अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमा प्रदर्शित होण्याची. आलिया भट्ट सोबत तो पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन,मौनी रॉय,नागार्जुन असे मोठे कलाकारही दिसणार आहेत, हा सिनेमा ९ सप्टेंबर,२०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT