Is Shah Rukh Khan the mysterious man holding the trident in Brahmastra?
Is Shah Rukh Khan the mysterious man holding the trident in Brahmastra?  Google
मनोरंजन

'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाला,पण चर्चा शाहरुखची रंगली; जाणून घ्या कारण

प्रणाली मोरे

१५ जून २०२२ हा दिवस सिनेमाच्या चाहत्यांसाठी खूपच महत्त्वाचा राहिला. शेवटी बहुचर्चित-बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) सिनेमाचा ट्रेलर(Trailer) प्रदर्शित झाला आहे. रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या(Alia Bhatt) सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी इतकं निरखून पाहिलं आहे की त्यातून त्यांनी शाहरुखला शोधून काढलंच. तुम्ही पाहिला नसेल तर चला आम्ही या बातमीच्या माध्यमातून दाखवतो.(Is Shah Rukh Khan the mysterious man holding the trident in Brahmastra?)

शाहरुखचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. चाहते केव्हापासून किंग खानची एक झलक पडद्यावर पहायला उत्सुक होते. आता वाटतंय की त्यांचं प्रतिक्षा पाहणं लवकरच संपणार आहे. या दरम्यानच आता लोकांनी 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचा ट्रेलर पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यात शाहरुखही आहे. अद्याप लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीय कारण शाहरुखनं ट्रेलरविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण शाहरुखच्या चाहत्यांनी ट्रेलरचा स्क्रीन शॉट्स काढून हा दावा केला आहे की तो सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. सोशल मीडियावर तर 'ब्रह्मास्त्र' च्या ट्रेलरमध्ये शाहरुख दिसला यावर नेटकऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शाहरुखचे चाहते यामुळे सुखावले आहेत. तसं चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले फोटो पाहिल्यावर तो शाहरुखच आहे असं वाटत आहे. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यावर खरं काय ते कळेल.

'ब्रह्मास्त्र' मध्ये जर शाहरुख(Shahrukh) खरंच कोणती भूमिका साकारत असेल तर ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल. रणबीर कपूर,आलिया भट्ट,अमिताभ बच्चन,नागार्जुन,मौनी रॉय या कलाकारांचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात रणबीर कपूर शिवा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर आलिया ईशा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरला पाहिल्यानंतर सिनेमा ब्लॉकबस्टर ठरेल असं बोललं जात आहे. पण प्रत्यक्षात सिनेमा कसा आहे यासाठी मात्र ९ सप्टेंबर,२०२२ या दिवसाची वाट पहावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT