Ishaan Khatter Instagram
मनोरंजन

Ishaan Khatter: बॉलीवूडमध्ये दुकान चालेना अन् ईशान खट्टरच्या हाती हॉलीवूडचा जॅकपॉट..कसं झालं शक्य?

शाहिद कपूरचा लहान भाऊ एवढीच ओळख सध्या तरी ईशानच्या नावावर आहे कारण हवा तसा सिनेमा अद्यापतरी बॉलीवूडमध्ये त्याच्या नावावर जमा झालेला नाही.

प्रणाली मोरे

Ishaan Khatter: हॉलीवूड सिनेमा Don Look UP रिलीज झाला आहे. लियोनार्डो डिकैप्रियो,जेनिफर लॉरेन्स,मेरिज स्ट्रीप सारख्या दिग्ग्ज कलाकारांच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की या सिनेमातील एका फ्रेममध्ये बॉलीवूड अभिनेता ईशान खट्टर नजरेस पडत आहे. अभिनेत्यानं आपल्या या छोट्याशा कॅमियो केलेल्या शॉटला इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. त्यानं हा व्हिडीओ शेअर करत स्वतःलाच चिडवलं आहे. (Ishaan Khatter Hollywood debut shahid kapoor younger brother)

सिनेमातील या सीक्वेन्सला शेअर करत ईशाननं लिहिलं आहे की-''अखेर ख्रिसमस इव्हिनिंगचा आनंद लुटण्याची वेळ आली आहे,एका अशा सिनेमासोबत ज्याची वाट मी गेल्या वर्षभरापासून करत होतो. हा छोटासा कॅमियो साकारणं, GOAT मेरिल स्ट्रीप आणि जीनियस लियो यांच्यासोबत एक एका मोंटाजमध्ये दिसणं खूप कूल होतं''.

ईशानच्या या कॅमियोनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सेलिब्रिटी, मित्र आणि त्याचे चाहते सगळ्यांनीच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'तु Awesome आहेल. हॉलीवूड तुला बोलावत आहे'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'तुझं हे सरप्राइज आवडलं आम्हाला'.

ईशानच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे,'आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यावर आम्हाला गर्व आहे छोटे मियां. 'डोन्ट लूक अप' मध्ये ईशानच्या कॅमियोनं सगळेच खूश आहेत'.

'डोन्ट लूक अप' सिनेमात ईशाननं छोटीशी भूमिका केली आहे,ज्यानं लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं राघव मानवलन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. जो भारताला कमी लेखल्या कारणानं अमेरिकेचे राष्ट्रपती ओरलिन(कथित) यांच्यावर टीका करतो.

मेरी स्ट्रीप सिनेमात राष्ट्रपती ओरलिनच्या भूमिकेत आहे. लियोनार्डो आणि जेनिफर छोटे-मोठे एस्ट्रोनॉमर्स आहेत ज्यांनी पृथ्वीच्या दिशेनं येणाऱ्या अन् पृथ्वीवर ज्यामुळे संकट ओढवू शकतं अशा धुमकेतूचा शोध लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT