Janata Raja in Lucknow: छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे नाही तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत. शिवरायांची गाथा जनमानसात पोहोचवण्याचे काम अनेकांनी केलंय. यामध्ये मोलाचा वाटा आहे तो बाबासाहेब पुरंदरेंचा.
बाबासाहेब पुरंदरे यांनी व्याख्यान आणि निसर्गाच्या माध्यमातुन शिवचरित्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतुन जाणता राजा हे भव्यदिव्य नाटक रंगमंचावर साकार झालं. आता हेच नाटक योगी आदित्यनाथांच्या भुमित लखनऊ मध्ये सादर होणार आहे.
(janata raja natak show in lucknow yogi adityanath)
लखनऊ मध्ये रंगणार जाणता राजा चे प्रयोग
'जाणता राजा' दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दाखल होत आहे. सुमारे 300 कलाकार आणि 100 तंत्रज्ञांच्या मदतीने हे नाटक जगातील एका ब्रॉडवे शोपेक्षा कमी नाही. हे नाटक जगभरात दाखवले गेलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते सिंहासनावर राज्याभिषेक होण्याची कथा या नाटकात पहायला मिळते.
लखनऊ येथे होणाऱ्या या कार्यक्रमाची जबाबदारी हरिद्वार येथील दिव्य प्रेम सेवा मिशनचे संचालक डॉ.आशिष गौतम उर्फ आशिष भय्या यांच्या खांद्यावर आहे. एकावेळी किमान 20,000 लोकं हे नाटक पाहू शकतील, अशी व्यवस्था आशिष गौतम यांनी केलीय.
नाटकाच्या माध्यमातुन प्रेक्षकांवर परिणाम
हरिद्वारस्थित दिव्य प्रेम सेवा मिशनचे संचालक डॉ. आशिष गौतम उर्फ आशिष भय्या म्हणतात, “नवीन पिढीला देशाच्या महान व्यक्तिमत्त्वांबद्दल सांगण्यासाठी नाटक हे सर्वात योग्य माध्यम वाटतं. जे पुस्तकातून स्पष्ट करता येत नाही, ते काही तासांत एका नाटकातुन कळतं.
जेव्हा पुस्तकातली गोष्ट रंगमंचाच्या माध्यमातून जिवंतपणे मांडली जाते, तेव्हा त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतो. 'जाणता राजा' हे नाटक उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आयोजित करण्याचा हाच उद्देश आहे.
जाणता राजा नाटकाबद्दल थोडंसं...
बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या नाटकाचे स्टेजिंग इतके अप्रतिम आहे की एकदा नाटक पाहणारे प्रेक्षक हे नाटक वर्षानुवर्षे विसरू शकणार नाहीत. 'जाणता राजा' ची तयारी नाटकाचे प्रयोग सुरु होण्यापुर्वी काही दिवस सुरू होते.
कारण नाटकासाठी स्थानिक कलाकार आणि नाटकातील मुख्य पात्रे साकारणाऱ्या कलाकारांची अप्रतिम रिहर्सल आवश्यक असते. हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी या सर्वांचे जीवंत सादरीकरण या नाटकात बघायला मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.