Javed Akhtar about his partnership with salim khan Google
मनोरंजन

Javed Akhtar:'सलीम खान सोबतची मैत्री तुटण्याचं दुःख वाटतं?', 'नाही' म्हणत अख्तरांनी थेट सांगितलं कारण..

अरबाज खानचा शो 'द इनविन्सिबल्स विथ अरबाज खान' चा नवा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये जावेद अख्तरांनी अनेक खुलासे केले आहेत.

प्रणाली मोरे

Javed Akhtar: सलीम-जावेदची आयकॉनिक जोडी तुटण्याचं भले सिनेप्रेमिकांना दुःख झालं असेल पण याचं जावेद अख्तरांना मात्र तिळमात्र वाईट वाटत नाहीय. आणि ही गोष्ट त्यांनी स्वतः सलीम खान यांचा मुलगा अरबाज खानला त्याच्या शो मधील एका मुलाखतीत सांगितली आहे.

याआधी अरबाज आपले वडील सलीम खान यांच्याशी देखील जावेद सोबत त्यांची जोडी तुटण्या संदर्भात बोलला आहे. तेव्हा सलीम खान म्हणाले होते की,''जावेद अचानक माझ्यापासून वेगळा झाला. मला त्याच्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती. किमान आणखी ५ वर्ष आम्ही तेव्हा काम करायला हवं होतं'', असं सलीम खान त्या मुलाखतीत म्हणाले होते.

अरबाज खानचा शो 'द इनविन्सिबल्स विथ अरबाज खान' चा नवा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये तो आपल्या वडीलांचे जुने मित्र जावेद अख्चर यांच्यासोबत संवाद साधताना दिसणार आहे.

सलीम खान सोबतच्या आपल्या मैत्रीविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले,''७८ साली आमचे दोन मोठे सिनेमे रिलीज झाले,त्रिशूल आणि डॉन. मग आम्हाला कोणताच सिनेमा मिळाला नाही. त्यावेळचे मोठे निर्माते काही कारणान आमच्या संपर्कात नव्हते''.

''मी मुंबईला आलो होतो ते दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन. सलीम खान हे एकच होते ज्यांना वाटत होतं मी लेखक म्हणून इंडस्ट्रीत नशीब आजमावलं पाहिजे. आम्ही दोघांनी काही असं एकत्र बसून वगैरे सोबतीनं काम करण्याचा निर्णय घेतला नव्हता. हे खूप सहज घडलं''.

''आणि आमचं नशीब पहा..तिथे एक साहेब बसले होते त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही लोक सिप्पी सिने कंपनीला भेट का नाहीत देत? मग आम्ही पैसे किती मागायचे तिथे जाऊन थेट हाच विचार करू लागलो''.

सलीम खान तेव्हा पटकन मला म्हणाले,'एक-एक हजार मागूया'.

''हाथी मेरे साथी' लिहिल्यावर काय लगेच तुम्ही मोठे हुशार नाही बनत. ते क्रेडिट तर हत्तींना जातं. एक सिनेमा होता ज्यानं आम्हाला खरं क्रेडिट मिळालं. तो होता जंजीर. जेव्हा आम्ही एका निर्मात्याला म्हणालो,साहेब आमचं पण नाव लिहा क्रेडिट्समध्ये''.

तेव्हा ते म्हणाले,''लेखकाचं नाव कधी लिहितात का? तेव्हा आम्ही म्हणालो,दोन जीप घ्या आणि जितके सिनेमाचे पोस्टर्स मुंबईत लागलेयत त्यावर सलीम जावेद लिहा. त्यानंतर एक महिना आम्हाला कोणी काम नाही दिला''.

त्यानंतर खूप मोठा निर्माता आम्हाला भेटला आणि म्हणाला,''तुमच्याकडे कोणती स्क्रीप्ट असेल तर सांगा. आम्ही लागलीच २ लाख सांगितले. ते दोन सेकंद शांत राहिले. मग आपल्या पार्टनरला बोलावून म्हणाले,जे मला सांगितलं ते यांना पण सांगा''.

अरबाज खाननं त्या मुलाखतीत जावेद अख्तरांना यशस्वी लग्नाचा मंत्र देखील विचारला आहे. यावर ते म्हणाले,''एका इंडिपेंडंट आणि स्ट्रॉंग माइंड असलेल्या महिलेसोबत संसार करणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे तुम्हाला देखील स्वतःला तेवढंच स्ट्रॉंग ठेवावं लागतं''.

सलीम आणि जोवद वेगळे का झाले या प्रश्नावर बोलताना, ''मला त्याचं वाईट वाटत नाही'', असं थेट उत्तर अख्तर यांनी दिलं. 'आमच्यात जो रॅपो होता तो संपला आणि आम्ही वेगळे झालो''.

एका जमान्यात खूप दारू प्यायचात आणि रातोरात का सोडली असा प्रश्न देखील अरबाजनं जावेद अख्तर यांना केला. तेव्हा ते म्हणाले, ''मी यासाठी दारू प्यायचो कारण मी ती एन्जॉय करायचो. मी कोणतं दुःख लपवण्यासाठी ती प्यायचो नाही. माझं जगण्यावर नितांत प्रेम आहे..ते माझं अॅडिक्शन आहे''.

''मी २० वर्षांपूर्वीच मेलो असतो तर मी मोबाईल फोन पाहिला नसता,ओटीटी सोबत माझी भेट झाली नसती..नवीन गोष्टी तर आता घडत आहेत. ही काय मरायची वेळ आहे''.

जेव्हा अरबाजनं तुम्हाला किती वयापर्यंत जगायला आवडेल असं जावेद अख्तरांना विचारलं तेव्हा ते म्हणाले,''मी लालची नाही पण १५ ते २० हजार वर्ष मला जगायला आवडेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT