Javed Akhtar
Javed Akhtar  esakal
मनोरंजन

Javed Akhtar : 'जावेदजी तुम्ही तर घरात घुसून मारलं!' तुम्हाला मानलं, चक्क कंगनाकडून तोंडभरून कौतूक

सकाळ डिजिटल टीम

Javed Akhtar Comment On Pakistani People mumbai : बॉलीवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानच्या लोकांना जे काही सुनावलं त्याची भारतामध्ये चर्चा होताना दिसते आहे. सोशल मीडियावर तर जावेद अख्तर यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. भारतावर पाकिस्तानच्या आंतकवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला होता. त्यावर अख्तर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर चर्चा होत आहे.

अख्तर यांचा स्पष्टवक्तेपणा हा चाहत्यांना चांगलाच माहिती आहे. आपल्या परखड वक्तव्यासाठी ते ओळखले जातात. त्यासाठी त्यांना अनेकदा ट्रोल देखील व्हावे लागले आहे. मात्र याचा जावेदजी कधीच फारसा विचार करत नाही. पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलेल्या अख्तर यांच्यावर आता भारतातून नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. चक्क बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगनानं देखील त्यांची प्रशंसा केली आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

अख्तर यांनी पाकिस्तानी लोकांना त्यांच्याच देशात जाऊन जे काही सुनावले त्यावरुन कंगनानं त्यांचे कौतूक करत, घरात घुसून मारलं...अशा शब्दांत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अख्तर यांनी तर तिच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव देखील घेतली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

कंगनानं अख्तर यांचे कौतूक करताना म्हटले आहे की, जावेद अख्तर यांची कविता ऐकल्यानंतर माता सरस्वती त्यांच्यावर प्रसन्न आहे असे वाटायला लागते. त्यांच्या कवितांमध्ये जो सच्चेपणा आहे तोच त्यांच्या वागण्यातही आहे. हे दिसून आले आहे. घर में घुस के मारा....जयहिंद, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले होते जावेद अख्तर....

त्या व्हिडिओमध्ये अख्तर यांनी केलेले वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. २००८ मध्ये मुंबईवर जो हल्ला झाला होता. त्यामधील गुन्हेगार अजुनही पाकिस्तानातील काही शहरांमध्ये मोकाट फिरत आहेत. आणि तुम्ही त्यांना फिरु देता. त्यामुळे तुमच्यावर भारतातील लोकांनी काही वक्तव्यं केली तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका. अशी प्रतिक्रिया जावेद अख्तर यांनी दिली होती.

पाकिस्तानकडून शांततेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी काय केलं पाहिजे असाही प्रश्न अख्तर यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, आपण जोपर्यत एकमेकांवर आरोप करणे थांबवत नाही तोपर्यत काही गोष्टी बदलणार नाही. जो गरम है फिझा वो कमी होनी चाहिए, हम तो बंबईया लोग है, हमने देखा वहा कैसे हमला हुआ था, ती लोकं काही नॉर्वेमधून तर आली नव्हती की इजिप्तमधून त्यांना कुणी पाठवले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'साराभाई' फेम अभिनेत्री करणार भाजपमध्ये प्रवेश!

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

गर्भ लिंग निदान चाचण्यांवरील बंदीमुळे स्त्री भ्रूणहत्या थांबू शकते, परंतू... IMA अध्यक्षांचे मोठे वक्तव्य

Ankur Warikoo's weight loss diet: अंकुर वारीकूने छोले भटोरे, गोड बंद न करता १० किलो वजन केलं कमी, पण कसं?

SCROLL FOR NEXT