Jawan Movie Zinda Song Anirudh Ravichander music  esakal
मनोरंजन

Jawan Zinda Banda Song : संगीतकार टॉलीवूडचा, डान्स स्टेपही टॉलीवूडचीच, हिट होण्याचा चोरटा 'फॉर्म्युला'

Shah Rukh Khan Jawan Movie Song Release : तुम्हाला शाहरुख आणि दीपिकाचा काही वर्षांपूर्वी आलेला चैन्नई एक्सप्रेस आठवत असेल तर त्यात त्यानं लुंगी डान्स गाण्यातून वेगळा तडका सादर केला होता.

युगंधर ताजणे

Jawan Movie Zinda Song Anirudh Ravichander music : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या जवानमधील जिंदा बंदा नावाचे गाणे आता सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. त्याला नेहमीप्रमाणे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यानं चाहत्यांना वेडं केलं आहे. शाहरुखनं वयाची साठी पार केली असली तरी जिंदा बंदामध्ये तो तिशीतला वाटू लागलाय. मेक अपची कमाल आणि किंग खानची धमाल चाहत्यांच्या आवडीचा विषय आहे.

तुम्हाला शाहरुख आणि दीपिकाचा काही वर्षांपूर्वी आलेला चैन्नई एक्सप्रेस आठवत असेल तर त्यात त्यानं लुंगी डान्स गाण्यातून वेगळा तडका सादर केला होता. हे गाणं साऊथ डान्स आणि म्युझिकच्या जवळ जाणारं होतं. त्यापूर्वी देखील रॉ वन मधून त्यानं असा प्रयत्न केला होता. पण तो बॉलीवूड आणि हॉलीवूड म्युझिक टच होता. जवानचं नवं गाणं समोर आल्यानंतर शाहरुख मात्र प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

जिंदा बंदामध्ये किंग खानची स्टाईल, त्याचा लूक, त्याची वेशभूषा हे सारं कमाल तर आहेच पण याशिवाय त्याच्या ज्या डान्स स्टेप आहेत त्या कमालीच्या प्रभावी आहेत. जिंदा बंदाच्या त्या गाण्याला स्वरसाज आहे तो प्रसिद्ध टॉलीवूडचा संगीतकार अनिरुद्धचा. याच अनिरुद्धनं गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूडला नाचवलं आहे. त्याचा विक्रम, बिस्ट सारख्या चित्रपटातील संगीताला प्रेक्षकांनी पसंत केले आहे.

विक्रमधील अनिरुद्धचे बीजीएम तर जबरदस्त आहे. ते प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर थलापती विजयच्या बिस्टमधील परफॉर्मन्स जोरदार होण्यामागे अनिरुद्धच होता. याशिवाय ज्यांनी नानीचा दसरा पाहिला असेल त्यांना अनिरुद्धचं संगीत काय चीज आहे हे वेगळं सांगण्याची गोष्ट नाही. ना रेड्डी गाणं तर नेहमीच युट्यूबवर ट्रेडिंग असते. आतापर्यत सर्वाधिक रिल्स त्या गाण्यावर झाले असतील.

हे सगळं पाहिल्यावर आणि ऐकल्यावर किंग खानला अनिरुद्धला घ्यावेसे वाटले तर त्यात नवल नाही. तसेही गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडचे अभिनेते हे टॉलीवूडच्या अभिनेत्यांना आपल्या चित्रपटातून ब्रेक देत एक वेगळं पॅकेज आपल्याला देत आहेत. शाहरुखनं अनिरुद्धला फ्री हँड दिला आणि त्यानंतर जे घडलं ते आता समोर आहे. सोशल मीडियावर किंग खान चर्चेत आहे. त्याचे जिंदा बंदा गाणं प्रचंड व्हायरल होत आहे.

गाण्यावर नेटकऱ्यांच्या येणाऱ्या कमेंटसही भन्नाट आहेत. मात्र यासगळ्यात काहींनी शाहरुखला शेवटी बॉलीवूडपेक्षा टॉलीवूडची क्रेझ जास्त वाटल्याचे म्हटले आहे. म्हणून तर संगीतकार दाक्षिणात्य आणि डान्स स्टेपही टिपीकल टॉलीवूड स्टाईलच्या वाटत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून बॉलीवूड पेक्षा टॉलीवूडच्या संगीताला आणि गाण्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT