Jawan Prevue  Esakal
मनोरंजन

Jawan Prevue: जवानमध्ये 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री! तुम्ही ओळखलं का?

Jawan Movie Trailer Launch : 'जवान' चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज होताच तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खानचे अनेक लूक्स दिसले. त्याचबरोबर चित्रपटात केवळ शाहरुखच अॅक्शन अंदाजात नाही तर सर्वच कलाकार अॅक्शन करतांना दिसत आहे.

Vaishali Patil

Shah Rukh Khan Latest Movie : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित 'जवान' चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडिओ सोमवारी रिलीज झाला आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिका साकारणार आहे.

'जवान' चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज होताच तो सोशल मीडियावर लोकप्रिय झाला. या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खानचे अनेक लूक्स दिसले. त्याचबरोबर चित्रपटात केवळ शाहरुखच अॅक्शन अंदाजात नाही तर सर्वच कलाकार अॅक्शन करतांना दिसत आहे.

विषेश म्हणजे दिपिकाही या चित्रपटात साडीवर अॅक्शन सीन करतांना दिसली. प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी आणि शाहरुखच्या चाहत्यांनी तर सोशल मिडियावर राडाच केला आहे.

सुपरहिट स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात एक लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्रीही दिसली. ती देखील चित्रपटात अॅक्शन करताना दिसत आहे. ती अभिनेत्री आहे गिरीजा ओक.

गिरीजा शाहरुखसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. तिनेही काही दिवसापुर्वी या बद्दल सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली होती.मात्र ती कोणती भुमिका साकारत आहे, हे सांगितलं नव्हत. आता या व्हिडिओत ती हातात गण घेवुन शाहरुखसोबत अॅक्शन सीन करतांना दिसली. हातात बंदूक घेवुन ती फायरिंग करतांना दिसली.

'जवान' हा शाहरुख खान आणि चित्रपट निर्मात्याचा पहिला कोलॅब आहे. जवान या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सान्या मल्होत्राही दिसणार आहे. जवान हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये या वर्षी 7 सप्टेंबरला पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे मात्र अजून तारीख निश्चित नाही.

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा प्रिव्ह्यू अॅक्शन पॅक आहे. प्रिव्ह्यूची सुरुवात शाहरुख खानच्या आवाजाने होते. ज्यामध्ये तो म्हणतो, ''मैं कौन हूं कौन नहीं, पता नहीं, ना तो कोई इरादा हूं. पुण्य हूं या पाप हूं ये खुद से पूछना क्योंकि मैं भी आप हूं. रेडी. नाम तो सुना होगा." 

प्रिव्ह्यू व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी शाहरुखच्या लुकचीही खुप प्रशंसा केली आहे. त्यामुळे आता 'पठाण' नंतर पुन्हा बॉक्स ऑफिसवर शाहरुख नावाचं वादळ येणार असं काहीसं चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT