Jennifer Lopez Ben Affleck Wedding esakal
मनोरंजन

Jennifer Lopez Ben Affleck Wedding: 20 वर्षानंतर लग्नाच्या बेडीत!

हॉलीवूड स्टार जेनिफर लोपेज आणि बेन अफ्लेक हे अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते.

युगंधर ताजणे

Jennifer Lopez Ben Affleck Wedding: हॉलीवूड स्टार जेनिफर लोपेज आणि बेन अफ्लेक हे अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाच्या यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर (Hollywood News) अफवा पसरल्या होत्या. या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना ते कधी लग्न करतात याची उत्सुकता होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल (social media viral news) मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या रिलेशनशिविषयी (hollywood love story) सांगायचे झाल्यास त्यांचे दोनदा ब्रेकअपही झाले होते. त्यानंतरही एकत्र येण्याचा निर्णय घेत त्यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

जेनिफर आणि बेन यांचा एप्रिलमध्ये साखरपूडा झाला होता. हॉलीवूडमधील प्रसिद्ध (Hollywood celebrities) गायिका आणि अभिनेत्री अशी जेनिफरची ओळख आहे. तिची आणि बेनची लवस्टोरी ही वीस वर्षांपूर्वीची आहे. रविवारी रात्री जेनिफरनं आपल्या लग्नाची घोषणा केली. आता तिनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेयर करत चाहत्यांना त्याविषयी माहिती देखील दिली आहे. लग्नानंतर जेनिफरनं आपलं नाव बदलून ते जेनिफर अफ्लेक असं केलं आहे.

2000 सालापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. 2002 मध्ये त्यांची एंगेजमेंटही झाली होती. मात्र त्यानंतर पुढच्या एका वर्षातच त्यांचे ब्रेक अप झाले. त्यांची वेगळ्या व्यक्तींसोबत लग्नही झाली. त्यांना मुलंही झाली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ते पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जेनिफर लोपेझच्या हेअर स्टायलिस्ट क्रिस एपलटाऊननं एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात जेनिफरचा वधूच्या रुपात दिसत आहे. चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचं कौतूकही केलं आहे. त्या व्हिडिओमध्ये क्रिसनं लिहिलं आहे की, लग्नापूर्वीची तो शेवटचा क्षण....जेनिफर आणि बेननं एका पत्र जाहिर करत आपलं लग्न झाल्याचे सांगितले आहे. जेनिफरनं त्यात म्हटलं आहे की, प्रेम हे फार सुंदर असतं. तसंच ते दयाळुही असतं. वीस वर्षांचा कालावधीनंतर आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही खूप आनंदी आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: कर्णधार सूर्यकुमार यादव भारताकडून खेळणार की नाही? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Tourists in Uttarakhand Video : मोठी बातमी! उत्तराखंडमधील महासंकटात अडकले महाराष्ट्रातील दहा पर्यटक

Uttarkashi Cloudburst Latest Update : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता, १० भारतीय लष्काराच्या जवानांचाही समावेश...

Latest Maharashtra News Updates Live : देश विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

SCROLL FOR NEXT