jitendra joshi wins best actor award in New York Indian Film Festival 2022
jitendra joshi wins best actor award in New York Indian Film Festival 2022  sakal
मनोरंजन

जितेंद्र जोशी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल

नीलेश अडसूळ

dodavari : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिनानाची बाब आता समोर आली आहे. ती म्हणजे प्रतिष्ठित अशा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल (Marathi Movie) २०२२ (NYIFF) मध्ये जिओ स्टुडिओजच्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटासाठी अभिनेता जितेंद्र जोशी (jitendra joshi) याला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' (best actor ) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतीच ही आनंदाची बातमी मराठी मनोरंजन विश्वात समजली असून सर्वस्तरातून जितेंद्रवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (jitendra joshi wins best actor award for godavari movie)

विशेष म्हणजे याच चित्रपट महोत्सवात ओपनिंग फिल्म म्हणून 'गोदावरी'ची निवड करण्यात आली होती. ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) पिक्चर्स निर्मित या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभाशाली कलाकार आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं आहे.

या चित्रपटात जितेंद्र जोशीच्या पत्नीची भूमिका साकारणारी गौरी नलावडे (actress gauri nalawade) हिने एक पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. ''क्षण अभिमानाचा!
New York Indian Film Festival 2022 मध्ये गोदावरीसाठी जितेंद्र जोशीला 'उत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार !'' असे तिने कॅपशन तिने दिले आहे. शिवाय IFFI मध्ये मानाचा Silver Peacock पुरस्कार पटकावल्यानंतर अभिनयाच्या या दुसऱ्या पुरस्कारासाठी जितेंद्र जोशीचे हार्दिक अभिनंदन! असेही तिने लिहिले आहे. (Our very own Jitendra Joshi wins the Best Actor award at NYIFF for GODAVARI. This is the second acting award for Jitendra after he won the prestigious Silver Peacock at the International Competition at IFFI.)

'गोदावरी' ही निशिकांतची कथा आहे, जो आपल्या कुटुंबापासून दूर झाला आहे. मुळात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी आणि कधीही न तुटलेली नाती सुधारण्यासाठी तो पुन्हा घरी येतो. त्याच्या आयुष्यातील, कुटुंबातील गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला 'त्या' नदीजवळ मिळणार आहेत, ज्या नदीचा त्यानं इतकी वर्षं तिरस्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT