Devara First Look out Esakal
मनोरंजन

Jr NTR Birthday: फॅन्सला रिटर्न गिफ्ट, RRR नंतर दुसरा धमाका करायला येतोय 'देवरा'

Vaishali Patil

Devara First Look out: साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही. केवळ देशातच नाही तर जगभरात त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

'RRR' चित्रपटानंतर त्याची लोकप्रियता ही कमालीची वाढली आहे. 'RRR' मधील 'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्कर जिंकला. आजज्युनियर एनटीआर त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त त्याने चाहत्यांना एक भेट दिली आहे.

ज्युनियर एनटीआरचे चाहते त्याच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक कोराताला शिवा आणि ज्युनियर एनटीआर हे दोघं त्याचा आगामी चित्रपट NTR 30 बद्दल सध्या खूप चर्चा आहे.

त्यानिमित्तानं त्य़ाच्या आगामी आणि बहुचर्चित अशा एनटीआर 30 चित्रपटाच्या नव्या लुकचे सरप्राईज गिफ्ट त्याच्या चाहत्यांना त्याला देण्यात आले आहे. याच चित्रपटाचे नाव देवरा असे आहे. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला एनटीआरच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.

यासोबतच निर्मात्यांनी सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. 5 एप्रिल 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. देवरा चित्रपटातील ज्युनियर एनटीआरचे जबरदस्त फर्स्ट लूक पोस्टरही सर्वांच लक्ष वेधुन घेत आहे.

सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर या आगामी चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जान्हवी कपूरनेही तिच्या वाढदिवशीच याची घोषणा केली होती. तिचा हा पहिला साऊथ चित्रपट असेल. ज्यामध्ये ती ज्युनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

ज्युनियर एनटीआर आणि दिग्दर्शक कोरातला शिवा यांचा चित्रपट संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. त्यामुळेच निर्माते हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित करणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Marriage Scheme : शेतकरी वराशी विवाह करणाऱ्या वधूच्या नावावर 10 लाख ठेवा; शेतकरी संघाची मागणी, नोकरीत आरक्षणाचाही आग्रह

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT