rrr movie 
मनोरंजन

RRR च्या एका दिवसाच्या शुटींगचा खर्च ऐकून व्हाल थक्क!

एस एस राजामौली (ss rajamauli) यांनी बाहूबली (bahubali) बनवला आणि त्याचं जगभर कौतूक झालं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - एस एस राजामौली (ss rajamauli) यांनी बाहूबली (bahubali) बनवला आणि त्याचं जगभर कौतूक झालं होतं. त्या चित्रपटानं आतापर्यत सर्वाधिक कमाई करुन बॉक्स ऑफिसवर (box office) इतिहास रचला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या आरआरआर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर (trailer) प्रदर्शित झाला होता. त्याला अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. नव्या वर्षात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहे.

सध्या आरआरआरच्या (rrr movie) प्रमोशनचे काम वेगानं सुरु आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. अजय देवगण, ज्युनियर नटराजन, आलिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आरआरचे ज्यावेळी चित्रिकरण सुरु होते त्याच्या खर्चाचे आकडे आता समोर आले आहेत. ते ऐकून हा चित्रपट किती भव्य पातळीवर तयार करण्यात आला आहे हे कळून येईल. त्यासाठी घेण्यात आलेली मेहनत प्रेक्षकांच्या लक्षात येईल. वास्तविक दोन वर्षांपासून या चित्रपटाची निर्मिती सुरु आहे. मात्र कोरोनाचा फटका आरआरआरला बसला. आणि निर्मात्यांपुढे समस्या निर्माण झाली होती.

आरआरआरचं जेव्हा चित्रिकरण सुरु होते तेव्हा त्याच्या चित्रिकरणाच्या एका दिवसाचा खर्च 75 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. बिग बजेट या चित्रपटामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. द क्वींटला आरआरआरच्या टीमनं दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगण्यात आली आहे. यावेळी एस एस राजामौली यांनी आपण या चित्रपटासाठी किती मेहनत घेतली हे अधोरेखित केले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना त्यातील अनेक गोष्टी नव्यानं जाणवतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT