Juhi Chawla Birthday sakal
मनोरंजन

Juhi Chawla Birthday: सलमान खानला करायचं होतं लग्न पण जुहीने दिला होता नकार; कारण…

जूहीसोबत लग्न करण्याची सलमान खानची इच्छा होती

सकाळ डिजिटल टीम

आज अभिनेत्री जुही चावलाचा वाढदिवस. 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्री चर्चा जूही चावलाच्या सुंदरतेची चर्चा बॉलीवूडच्या बाहेरही होती. एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच सुंदर दिसणारी जूही प्रत्येकाची आयुष्यातील ड्रिम गर्ल होती.

मॉडलिंगच्या जगात चांगले नाव कमावल्यावर जूहीने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले.1987 मध्ये रिलीज झालेल्या ‘सल्तनत’ चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.  त्यानंतर जूही चावलाने ‘डर’, ‘दीवाना मस्ताना’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार’ सारख्या एकापेक्षा एक हिट मुव्हीज दिल्यात. (Juhi Chawla Birthday)

जूही चावलाचे वैयक्तिक आयुष्यही तेवढेच गाजले. जेव्हा तिने 1995 मध्ये व्यावसायिक जय मेहता यांच्यासोबत लपून लग्न केले होते. पण तुम्हाला माहिती आहे का जूहीसोबत लग्न करण्याची सलमान खानची इच्छा होती पण ही प्रेमकहाणी अपूर्णच राहली. (Salman khan and juhi chawla love story)

सलमान खानला बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर म्हणून ओळखले जाते. तो आजही सिंगल आहे. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. मात्र एक वेळ अशी होती की सलमान खानला जूही चावला आवडायची.

एवढंच काय तर सलमानने अनेकदा जाहीरपणे जुही सोबत लग्न करण्याची इच्छाही बोलून दाखवली. मात्र जूही चावलाच्या वडिलांमुळे हे प्रकरण पुढे आले नाही आणि जुहीने लग्नाला नकार दिला.

एका रिपोर्टनुसार सलमान खानला जूही चावला एवढी आवडायची की तो थेट जुहीच्या वडिलांजवळ जुहीचा हात मागायला गेला. मात्र जूही चावलाच्या वडिलांनी सलमानला रिजेक्ट केलं. एका मुलाखतीत सलमान खानने याबाबात खुलासा केला.

सलमान म्हणाला, "जूही खूप छान आहे. मी तिच्या वडिलांना विचारले होते की तुम्ही जुहीला माझ्यासोबत लग्न करुन द्याल का त्यावर तिच्या वडिलांनी नकार दिला होता. कदाचित त्यांना मी आवडलो नाही. माहित नाही त्यांना कसा मुलगा हवा होता?"

जूही चावलाने जय मेहतासोबत त्यावेळी लग्न केले जेव्हा ती बॉलिवूडमधील टॉपची अॅक्ट्रेस होती. 1995 मध्ये लपून त्यांनी लग्न केले. जय आणि जूही यांची पहिली भेट राकेश रोशननी करुन दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीकता वाढत गेली. विशेष म्हणजे जूहीने आपले लग्न सहा वर्ष जगापासून लपवून ठेवले होते. जेव्हा जूही पहिल्यांदा प्रेग्नेंट राहली तेव्हा तिचे सहा वर्षापूर्वीच लग्न झाल्याचे समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT