Ajay Devgan,Kajol Google
मनोरंजन

'अजय माझा फक्त नावाला नवरा';काजोलचं काय बिनसलं?

सोशल मीडियावर अभिनेत्रीची 'ती' पोस्ट जोरदार व्हायरल होतेय.

प्रणाली मोरे

काजोल(Kajol) आणि अजय देवगण(Ajay Devgan) हे बॉलीवूड(Bollywood) मधलं तसं खूप मॅच्युअर्ड कपल म्हणता येईल. कधी हे दोघे फार चार-चौघात हसता-खिदळताना दिसत नाहीत,ना कुठल्या फंक्शनमध्ये हातात-हात घालून मिरवताना दिसतात ना कधी एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करताना दिसतात. पण यांचा सुखा-सुखी चाललेला संसार मात्र यांच्यात सगळं आलबेल आहे याची खूणगाठ बांधतो. पण आता सोशल मीडियावर अजयसंदर्भात काजोलनं जे काही पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यावरुन चर्चेला मात्र सुरुवात झाली आहे.

सुरुवातीला आम्ही हे स्पष्ट करतो की ती काजोलनं केलेली पोस्ट थोडी मजेदार आहे. आणि ती पोस्ट तिनं तिच्या सासूच्या संदर्भात केली आहे. म्हणजे सासू आणि तिच्या नात्याविषयी थोडक्यात तिनं सांगितलं आहे,तेव्हा अजयवरनं तिनं एक जोक मारला आहे. काजोलनं ही पोस्ट तिच्या सासूच्या वाढदिवसानिमित्तानं केली आहे. ज्यात तिनं सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या दोघींच्या नात्याविषयी छान लिहिलंही आहे. तिनं दोघींचा छान फोटो पोस्ट केला आहे. ज्यात काजोलनं व्हाईट आणि गोल्डन रंगाची साडी नेसली आहे तर तिच्या सासूने पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय,''जेव्हा तुम्ही एका पुरुषासोबत लग्न करता,तेव्हा त्याच्यासोबत त्याचं कुटुंब हे देखील तुमच्या आयुष्यात येतं. असंच आमच्या कुटुंबातील माझ्या आवडत्या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे,जो कायम माझ्यासोबत असतो,ती म्हणजे माझी सासूबाई. आणि अनेकदा मला वाटतं मी अजयपेक्षा माझ्या सासूशीच लग्न केलं आहे. मला त्या माझ्या नवऱ्याच्या जागी वाटतात. इतक्या त्या माझी काळजी घेतात,माझे लाड करतात. हॅप्पी हॅप्पी बर्थ डे टू वीणा देवगण''.

या काजोलच्या पोस्टवर तिच्या चाहत्यानं लिहिलंय,'सो क्यूट. सासू-सूना एकत्र खूप छान दिसत आहात'. तर दुसरा एकजण म्हणाला आहे,'काजोल तुम्ही दोघी खूप छान दिसत आहात. वीकेन्डला एक छान विचार देऊन आमचं मन प्रसन्न केलंस'. अजय देवगणनेही मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं की,''माझ्यापेक्षा जास्त काजोल माझ्या आईसोबत वेळ घालवणं पसंत करते,काजोलला माझ्या आईची कंपनी अधिक आवडते. तिला आईसोबत अधिक सुरक्षित वाटतं''. काजोलला आपण नेटफ्लिक्सच्या 'त्रिभंगा' वेबसीरीजमध्ये पाहिलं होतं. २०२१ सालात ती सीरीज आपल्या भेटीस आली होती. तर सिनेमागृहात शेवटचा तिचा पाहिलेला सिनेमा हा २०२० मध्ये प्रदर्शित झालेला 'तान्हाजी'. या सिनेमात अजय देवगणने 'तान्हाजी' ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती, तर त्याच्या बायकोची म्हणजे सावित्रीबाई मालुसरेची भूमिका काजोलने साकारली होती. हा सिनेमा सुपरहीट ठरला होता. काजोल लवकरच आपल्याला 'सलाम वेंकी' मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Commission Report : दबावाखाली अर्ज माघारी? पुण्यातील बिनविरोध निवडणुकांवर आयोगाचा रिपोर्ट कार्ड

Shubman Gill : शुभमन गिलला संघातून वगळले, पुनरागमन लांबणीवर पडले; निवड समितिच्या निर्णयाने सर्वच अचंबित

Panchang 3 January 2026: आजच्या दिवशी दशरथ विरचित शनिस्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pume Municipal Election : भाजपच्या अनेकांचे बंड झाले थंड

अक्षय खन्नाने भर मंडपात गर्लफ्रेंडला केलेला किस, प्रेमात होता पुर्णपणे वेडा, कोण होती ती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT