Kajol reaction after Ajay Devgan got National Award.. Instagram
मनोरंजन

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अजय देवगणची बायकोनेच घेतली फिरकी, काजोलची भन्नाट पोस्ट...

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं आयोजन ३० सप्टेंबर,२०२२ रोजी नवी दिल्लीत करण्यात आलं होतं.

प्रणाली मोरे

Kajol: ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन ३० सप्टेंबर,२०२२ रोजी नवी दिल्लीत करण्यात आलं होतं. भारताच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या तर्फे सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा तब्बल २ वर्षाच्या अंतरानं पार पडला. यावर्षी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता अजय देवगण याला त्याच्या 'तानाजी' सिनेमासाठी, तर 'सोरारुई पोटारु'साठी साऊथस्टार सूर्या यांना मिळाला.

सूर्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका हिनं सोशल मीडियावर 'प्राउड वाइफ' अशी पोस्ट शेअर केली तर दुसरीकडे आपल्या काजोलने अजयची प्रशंसा करणारी एक फनी पोस्ट शेअर केली. आणि तिची ती पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(Kajol reaction after Ajay Devgan got National Award..)

Kajol reaction after Ajay Devgan got National Award..

काजोलनं इन्स्टाग्रामवर अजय देवगचा फोटो शेअर केला आहे,ज्यात राष्ट्रापती दौपदी मुर्मु यांच्याकडून तो नॅशनल अॅवॉर्ड स्विकारताना दिसत आहे. या फोटोला शेअर करत काजोलनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''घरी दोन दोन नॅशनल अॅवॉर्ड घेऊन येणं आणि चांगलं दिसणं खूप कठीण आहे''. तसं पाहिलं तर पुरस्कार सोहळ्यात अजय सूटा बूटात खूप हॅंडसम दिसत होता.आणि म्हणूनच काजोलनं आपल्या मजेदार स्टाईलमध्ये त्याची प्रशंसा करताना फिरकी घेण्याची संधी मात्र सोडली नाहीय.

अजय देवगणला 'तानाजी-द अनसंग वॉरियर' सिनेमातील त्याच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. याआधी देखील अजयनं आपल्या 'जख्म' आणि द' लीजेंड ऑफ भगत सिंग' सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

यावेळी अजय देवगण सोबत उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार साउथ स्टार सूर्याला त्याच्या 'सोरारुई पोटारू' सिनेमासाठी विभागून देण्यात आला. 'सोरारुई पोटारू' नं तब्बल ५ राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. 'सोरारुई पोटारू' सिनेमाला उत्कृष्ट सिनेमा,उत्कृष्ट अभिनेता,उत्कृष्ट अभिनेत्री, बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले आणि उत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोर असे पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

अजय देवगणने अभिनेता सूर्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ''सूर्यासोबत पुरस्कार सोहळ्यात एकत्र खूप चांगला वेळ घालावायला मिळाला. मी त्याच्या टॅलेंटचा आदर करतो,त्याचे सिनेमे देखील मला खूप आवडतात'',असं अजयनं आपल्या पोस्टमध्ये सूर्याविषयी लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Homes Set on Fire in Bangladesh: बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

BMC Election: महायुतीत नाराजी स्फोट! शिंदे गटात राजीनाम्यांची मालिका, भाजपमध्येही समाज माध्यमावर खदखद

Banking Job Vacancies: बँक ऑफ इंडियात पदभरती; 514 जागांसाठी जाहिरात निघाली, वाचा डिटेल्स

PMC Election Nominations : धनकवडी–सहकारनगर कार्यालयात उमेदवारांची गर्दी; ५९ जणांचे नामनिर्देशन अर्ज दाखल!

Latest Marathi News Live Update : - छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या समर्थकांच्या भाजपविरोात घोषणा अन् युती तोडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT