Kajol Google
मनोरंजन

काजोलचा बॉलीवूडविषयी मोठा खुलासा, 30 वर्ष काम केल्यानंतर आता म्हणतेय...

'कोण होणार करोडपती' या मराठी कार्यक्रमाच्या मंचावर काजोलनं आपल्या चाहत्यांना धक्का देणारं विधान केलं आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये(Bollywood) 'सिमरन' आणि 'अंजली शर्मा' या प्रसिद्ध झालेल्या भूमिकांनी काजोलला आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आणि अजूनही तिच्याबाबतीत हा सिलसिला सुरूच आहे. तगडी फॅन फॉलॉइंग असणारी काजोल(Kajol) आजही आपलं मनमोकळं हास्य अन् बडबड करण्याचा स्वभाव यामुळे अधिक पसंत केली जाते. तिला नेहमीच चाहते वेगवेगळ्या भूमिकांत पाहणं पसंत करतात. पण असं असलं तरी खूप कमी जणांना माहित असेल की काजोलला बॉलीवूडमध्ये यायचच नव्हतं,ना अभिनेत्री बनायचं होतं. तिला आयुष्यात खूप वेगळं काहीतरी करायचं होतं. याचविषयी एक मोठा खुलासा तिनं मराठी 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati)या रिअॅलिटी शो मध्ये केला आहे.(Kajol Never Wanted To Be A Part Of Bollywood)

काजोल आपली आई तनुजासोबत 'कौन बनेगा करोडपती' या शो चं मराठी व्हर्जन असलेल्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून पोहोचली होती. या कार्यक्रमात शो चे होस्ट सचिन खेडेकर यांना तिनं सांगितलं की तिला कधीच बॉलीवूडमध्ये यायचं नव्हतं. ती म्हणाली,''मला कधीच बॉलीवूडच्या हिंदी सिनेइंडस्ट्रीचा भाग बनायचं नव्हतं. मला इथे अभिनेत्री म्हणून एन्ट्री घ्यायचीच नव्हती. मला नेहमीच ९ ते ५ अशी नोकरी करायची होती. ज्याने महिन्याला माझ्या अकाऊंटला एक सॅलरीचा चेक येत राहील''.

काजोलने २०१९ मध्ये एका वृत्तसंस्थेशी बातचीत करताना म्हटलं होतं की,''मी अभिनेत्री खूप अनपेक्षितपणे बनली. माझ्या करिअरची सुरुवातही काही फारशी चांगली नाही झाली. आणि तसंही मी करिअर म्हणून अभिनय क्षेत्राचा कधी विचारच केला नव्हता. बस हे माझ्यासोबत अचानक घडलं आणि मग मी त्यासोबत पुढे गेली. मी नेहमीच खूप सिलेक्टिव्ह राहिलेय. मी सिनेमे देखील निवडून केलेयत. आणि त्या सगळ्याच सिनेमांनी मला खूप खास क्षण दिले''.

काजोलने बॉलीवूडमध्ये पदार्पण १९९२ साली 'बेखुदी' या सिनेमातून केलं. त्यानंतर तिनं 'बाजीगर','ये दिल्लगी', 'करण अर्जुन','दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे','कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम','गुप्त', 'माय नेम इज खान','तान्हाजी' सारख्या सिनेमांतून खूप दर्जेदार भूमिका केल्या.

काजोलला आपण २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'त्रिभंगा' सिरीजमध्ये पाहिलं होतं. तिच्यासोबत तनवी आझमी ,मिथिला पालकर देखील होत्या. सध्या काजोल आपल्या आगामी 'सलाम वेन्की' सिनेमावर काम करीत आहे. २०२१ ऑक्टोबरमध्ये या सिनेमाची घोषणा झाली होती तेव्हा 'द लास्ट हुर्राह' असं सिनेमाचं नाव होतं. पण त्यानंतर काही कारणानं सिनेमाचं टायटल बदललं गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT