Kajol wish her mother Tanuja on her 75th birthday  
मनोरंजन

HappyBirthdayTanuja : 75व्या वाढदिवशी काजोलने दिलं आई तनुजाला खास गिफ्ट!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचा आज 75वा वाढदिवस! तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची लेक व प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने इन्स्टाग्रामवरून खास शुभेच्छा दिल्या आहेत. ती दरवर्षीच आपल्या आईचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करते. यावर्षीचा वाढदिवस 75वा असल्याने तो आणखीनच खास आहे.

काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तनुजा यांचे वेगवेगळे फोटो टाकून '75 & Fabulous' असे प्रत्येक फोटोवर लिहिले आहे. यात त्यांचे जुने फोटो, काजोल व तनिषासोबतचे छान छान फोटो शेअर केले आहेत. या सर्व फोटोंचा व्हिडिओ तयार करून तिने तो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केलाय. 

तनुजा या मूळच्या मराठी असून लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती. पूर्वीचे चित्रपट गाजवल्यानंतर अलीकडच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांत आईची भूमिका साकारली. 2013 मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले होते. यामुळे त्यांचे विशेष  कौतुक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT