Kangana Ranaut advised fans not to go to Himachal Pradesh esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: 'माझं ऐका, आता चुकूनही हिमालयाच्या वाट्याला जाऊ नका'! कारण...

सोशल मीडियावर कंगनानं दिलेला तो सल्ला आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

युगंधर ताजणे

Kangana Ranaut advised fans not to go to Himachal Pradesh : बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना ही हिमाचल प्रदेश येथे राहणारी आहे. आता तिनं तिच्या इंस्टावरुन खास पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं जे लोकं हिमाचल प्रदेशमध्ये जाण्यास उत्सुक आहेत त्यांना एक सल्ला दिला आहे. जो व्हायरल होतो आहे.

उत्तर भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तराखंड मधील प्रशासनानं युद्धपातळीवर काही निर्णय जाहीर केले आहेत. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आता हिमाचल प्रदेशममध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं एक खास पोस्ट शेयर केली आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ती म्हणते, गेल्या काही दिवसांपासून हिमालयामध्ये वातावरण चांगले नाही. तिथली भौगोलिक परिस्थिती फारच वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही जर आता हिमालयात जात असाल तर तुमची यात्रा थांबवा. तिथे खूपच पाऊस सुरु आहे. आणि अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशावेळी एक यात्री आणि प्रवासी म्हणून तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे.असे कंगनानं म्हटले आहे.

पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून कृपया करुन तुम्ही हिमालयाच्या वाटेला जाऊ नका. हे माझे सांगणे आहे. तसे केल्यास ते धोक्याचे ठरु शकतं. सध्या हिमालयाचे वातावरण खूपच खराब आहे. तुम्ही घरातच आपल्या कुटूंबासमवेत सुरक्षित राहा. आणि बाकीच्यांना देखील सुरक्षित राहायला सांगा. असे कंगनानं म्हटले आहे. कंगनाची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा इमर्जन्सी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यात कंगनाच्या लूकचे कौतूक झाले होते.

यानंतर कंगना ही तेजस नावाच्या चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. त्यात ती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाची निर्मिती असलेला आणि नवाझुद्दीन नवनीत कौरची भूमिका असलेला टीकू वेड्स शेरु नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला होता. तो चित्रपट फारसा काही चालला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT