kangana-hrithik 
मनोरंजन

कंगना रानौतने हृतिक रोशनवर साधला पुन्हा निशाणा; वाचा सविस्तर...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढविला होता.

त्यानंतर हा मुद्दा हिंदी चित्रपटसृष्टीतील चर्चेचा विषय ठरला होता. आता तिने पुन्हा तोंडसुख घेतले आहे अभिनेता हृतिक रोशनवर. हृतिक भाड्याच्या घरात राहात होता आणि त्या घराचे भाडे त्याचे वडील भरत होते, असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे आणि त्यामुळे पुन्हा हृतिक आणि कंगना यांच्या वादाला नव्याने तोंड फुटले आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यातील व्दंद्व सगळ्यांना माहीत आहे. कंगनाने हृतिकवर विविध आरोप केले आणि हृतिकनेही तिच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर काहीसा हा वाद थंडावला होता. परंतु पुन्हा आता वादाची ठिणगी पडली आहे. कंगनाने एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की जेव्हा मी हृतिकबरोबर काम करीत असताना तेव्हा हृतिकने आपल्या एका मित्राला मी त्याच्या पैशाच्या मागे आहे, असे म्हटले होते.  याबद्दल बोलताना आता तिने आपली सफाई दिली आहे. 

ती म्हणते की, मला गर्व आहे मी मुंबईत माझे स्वतःचे घर आहे आणि स्वतःचे आलिशान ऑफिस आहे. हृतिक भाड्याच्या घरात राहतो आणि त्याचे भाडे त्याचे वडील भरतात, असे कंगनाचे म्हणणे आहे. जेव्हा आमची न्यायालयीन लढाई सुरू झाली तेव्हा काही जणांनी मी छोट्या शहरांतून आली आहे आणि हृतिकच्या पैशाच्या मागे आहे, असे म्हटले होते. त्यावेळी मी पैशाच्या मागे नाही हा मुद्दा कसा खोडून काढावा या विचारात होते. पण तेव्हा मी हादेखील विचार केला की माझे स्वतःचे घर आणि ऑफिस आहे. त्यामुळे मी अशा बाबींकडे दुर्लक्ष केले, असेही तिचे म्हणणे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुणी गॅस देता का गॅस? मुंबईत ४-५ किमीपर्यंत रांगा, पुण्यात पहाटेपासून लोक रांगेत; काळ्याबाजारात एक किलोसाठी ५०० ते ७०० रुपये

Breaking: IPL 2026 चं वेळापत्रक बदलणार? RCB चे सामने एम चिन्नास्वामीवर होणार की नाही? आले मोठे अपडेट्स

LPG चं टेन्शन तर काहीच नाही..अजून खरा बॉम्ब ब्लास्ट आहे बाकी; 1 एप्रिलपासून तुमच्या खिशाला लागणार युद्धाची झळ, 'या' 15 वस्तू महागणार

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या सेटवर पुलाव तर तुला जपणार आहेच्या सेटवर चुलीवरचं जेवण, चहा सुद्धा केला बंद!

Latest Marathi Update : युद्धाचा परिणाम झेंडू बाजारावर; दर घसरल्याने शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT