Kangana Ranaut Instagram
मनोरंजन

Kangana Ranaut: 'माझ्याबाबतीत कॉलेजच्या प्रिन्सिपलनी भविष्यवाणी केली होती की..', कंगनाचा मोठा खुलासा

कंगना रनौतनं सोशल मीडियावर कॉेलेजच्या दिवसातले काही फोटो शेअर करत प्रिन्सिपलनी केलेल्या भविष्यवाणीविषयी सांगितले आहे.

प्रणाली मोरे

Kangana Ranaut:बॉलीवूडची क्वीन कंगना रनौत आपल्या सिनेमांमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेली पहायला मिळते पण त्यासोबतच आपल्या बेताल वक्तव्यांमुळे देखील ती चर्चेत असते. तिला प्रचंड ट्रोलही केलं जातं. एवढंच नाही तर ती सोशल मीडियावर इतर सेलिब्रिटींपेक्षा सर्वात जास्त सक्रिय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

अलिकडे तर ती आपले काही जुने फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत जरा जास्तच शेअर करताना दिसते. नुकतेच कंगनाने सोशल मीडियावर आपल्या लहानपणीचे काही फोटो शेअर केले आहेत.(Kangana Ranaut share college days photo and memory on social media)

Kangana Ranaut Photo

कंगनानं आपले काही जुने फोटो शेअर करत आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची खूप प्रशंसा देखील केली आहे. कंगनाचे हे फोटो तिच्या कॉलेजच्या दिवसांचे आहेत. एका फोटोत ती शेतात बसलेली दिसत आहे. या फोटोंना शेअर करत कंगनानं सोबत एक भावूक नोट देखील लिहिली आहे.

या फोटोंमध्ये तिनं आपल्या हॉस्टेलच्या पहिल्या दिवशीचा एक फोटो शेअर केला आहे आणि सांगितलं आहे की तिच्या प्रिन्सिपल मॅडम मिस सचदेवानं कंगनाचा ड्रेस पाहून तिला त्यांच्याजवळ बोलावलं आणि विचारलं,'तु कुठून आली आहेस?' कंगनानं अगदी लाजत-मुरडत सांगितलं..''मी हिमाचल प्रदेशमधून आहे''.

पुढे कंगना म्हणाली,''यानंतर प्रिन्सिपल मॅडमनी मला विचारलं की,'तु हा ड्रेस कुठून घेतलास?''

कंगना म्हणाली,''हा ड्रेस तिनं स्वतः डिझाईन केला आणि गावातील एका टेलरकडून शिवून घेतला आहे''.

तेव्हा कंगनाच्या प्रिन्सिपल मॅडम तिच्याकडे पाहून हसल्या आणि तिला मिठी मारत म्हणाल्या,'तु एक दिवस सिनेमात मोठी स्टार बनशील'.

Kangana Ranaut in college days

कंगनानं आणखी काही फोटो शेअर करत सांगितलं की बॉलीवूड इंडस्ट्रीत मी आले तेव्हा माझ्या प्रिन्सिपल मॅडमनी माझा कॉलेजतर्फे सम्मान केला.

कंगनानं लिहिलं आहे की, ''मला आठवतंय त्याक्षणी तिथं खूप लोक उपस्थित होते आणि सगळेच माझ्यासाठी खूश होते. पण माझ्याप्रती सर्वात जास्त अभिमान माझ्या प्रिन्सिपल मॅडमच्या चेहऱ्यावर होता.

आपल्या स्टोरीच्या शेवटच्या फोटोत कंगना म्हणाली की,''जेव्हा कधी प्रिन्सिपल मॅडम मला भेटायला मुबंईला यायच्या तेव्हा नेहमी माझ्या कपाळावर किस करत मला आशीर्वाद द्यायच्या. आणि तो माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद असायचा''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT