Kangana-Urfi War Esakal
मनोरंजन

Kangana-Urfi War: कंगना रणौत अन् उर्फीमध्ये वाजलं! 'पठाण'चा वाद थेट समान नागरी संहितेवर..

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खानने त्याचा 'पठाण' हा चित्रपट केवळ लोकांच मनोरंजन करण्यासाठी केला आणि हा चित्रपट प्रेक्षकांच मनोरंजन करण्यात यशस्वीही झालेला दिसतोय. मात्र शाहरुखचा पठाण हा चित्रपट सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अटकलेला दिसला. आता चित्रपट रिलिज झाला असला तरी यावरुन वाद होतांना दिसत आहे.

कंगणा आणि बॉलिवूडचा नेहमीच बिनसलेलं असंत हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. काही दिवसांपुर्वीच कंगाणा ट्विटवर परतली आहे. त्यानंतर तिने पुन्हा तिच्या ट्विटची मालिका सुरु केली आहे. 'पठाण' रिलिज झाल्यानंतर कंगणाने काही ट्विट केले. ज्यांची सध्या चर्चा सुरु आहे.

नुकतेच त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, या देशाने फक्त आणि फक्त खान यांच्यावरच प्रेम केले आहे. याशिवाय इथले लोक मुस्लिम अभिनेत्रींचे वेडे असल्याचेही तिनं सांगितलं. कंगनाच्या या वक्तव्यावर उर्फीने प्रत्युत्तर दिलयं आणि त्यानंतर कंगनानेही उर्फीला उत्तर दिले.

जशी कंगना तिच्या वक्तव्यामुळं चर्चेत असते तशीच उर्फीही तिच्या सडेतोड उत्तर अनेक कारणांनी चर्चेत असते. नुकतच उर्फीनं कंगणाच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं ती म्हणाली, कंगनाच्या ट्विटवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया दिली.

तिने लिहिले, "ओह माय गॉड.. काय विभागणी आहे. मुस्लिम कलाकार, हिंदू कलाकार. कला ही धर्मात विभागलेली नाही. इथे फक्त कलाकार आहेत." त्याचबरोबर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटलाही स्टोरी टाकत, 'तुझी तुलना SRK सोबत करु नकोस' असं कंगणाला बजावलं आहे.


मात्र प्रकरण इतक्यातच थांबलं नाही. उर्फीच्या ट्विटनंतर काही वेळातच कंगनाने तिच्या ट्विट करत उत्तर दिले.

कंगना रणौतने लिहिले, "होय, माझ्या प्रिय उर्फी, हे एक आदर्श जग झाले असते, परंतु जोपर्यंत येथे यूनिफॉर्म सिविल कोड येत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही, तोपर्यंत हा देश संविधानाने विभागलेला आहे आणि विभागलेलाच असेल. 2024 च्या जाहीरनाम्यात आपण सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे समान नागरी संहितेची मागणी करूया."

'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त तुफान कमाई केली आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत देशभरात सुमारे 275 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: 0 टक्के मेकिंग चार्जेसच्या नावाखाली ज्वेलर्स करत आहेत ग्राहकांची फसवणूक; होऊ शकतं लाखोंच नुकसान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ वाढविण्याचा पुन्हा इशारा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय पण...

Women's ODI World Cup 2025 SF Scenario : १ जागा, पाच स्पर्धक! भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अन् न्यूझीलंड कसे पोहोचणार उपांत्य फेरीत?

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

Marriage Fraud : लग्नानंतर काही मिनिटांतच वधू भूर्रर्र...; नाशिकच्या शेतकरी तरुणाला चार लाखांना गंडवले, काही क्षणांत स्वप्नांचा झाला चुराडा

SCROLL FOR NEXT