मनोरंजन

किती मुर्ख आहे मी,हो की नाही? कंगनानं उर्मिला मातोंडकर यांना सुनावलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई -  कोणाशी कंगणाची भांडणे नाहीत असा सेलिब्रेटी शोधून सापडणार नाही. जवळपास प्रत्येक सेलिब्रेटीशी तिनं पंगा घेतला आहे. त्यामुळे अनेकांच्या विरोधाला तिला सामोरं जावं लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिचा आणि उर्मिला यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. त्यावरुन कंगणाला नेटक-यांनी ट्रोल केले आहे. आताही त्या दोघींमधील कलगीतुरा नेटक-यांच्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. 

दोघींमध्ये वाद होण्याचे कारण म्हणजे उर्मिलानं मुंबईमध्ये तीन कोटी रुपयांच एक बंगला खरेदी केला आहे. त्यावरुन कंगणानं उर्मिलाला लक्ष्य केलं आहे. कंगणा सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यानं ती कायम कुणावर शाब्दिक तोफ डागत असते. ब-याचदा चर्चेत राहण्यासाठीही कंगणा अनेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षांपासून उर्मिला आणि कंगणा यांच्यात वादाला सुरुवात झाली. व्टिटरवर कंगणानं काही आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यापूर्वीही तिनं शेतक-यांच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी तिचा आणि अभिनेता दिलजीत दोसांज यांच्यात कमालीचा वाद झाला होता. 

सरकारवरही टीका करण्यात कंगणानं मागेपुढे पाहिले नाही. अनेक राजकीय नेत्यांवर तिनं तोफ डागली होती. कंगणाचे घर तोडल्या प्रकरणी त्यावरुन मोठा वाद झाला होता. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कॉग्रेस सोडून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर काही दिवसांतच तिन मुंबईतील सब अर्बन एरियामध्ये एक ऑफिस घेतले आहे. त्याची किंमत ३ कोटी रुपये आहे. यावरुन कंगणाने उर्मिलाला टार्गेट केले आहे. तिनं लिहिलं आहे की, उर्मिलाजी मी माझ्या मेहनतीनं जे घर तयार केले आहे ते कॉग्रेसनं पाडलं. मी भाजपला खुश केल्यानंतर माझ्या हाती 25 ते 30 केस लागल्या आहेत. मी पण तुमच्यासारखे हुशार असायला हवे होते, किती मुर्ख आहे मी, हो की नाही? अशा शब्दांत कंगणानं उर्मिलाला सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये टेम्पो दुचाकीवर आदळून एकाचा मृत्यू

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

SCROLL FOR NEXT