kangna ranaut inaugurated her own studio manikarnika films 
मनोरंजन

'चिंधी ब्रॅंडची जाहिरात न करता कंगणाने घेतली इमारत' बहिण रंगोलीचं सणसणाती ट्विट

वृत्तसंस्था

मुंबई : बोल्ड आणि तितकीच स्पष्टवक्ती अशी ओळख असणारी बॉलिवूडची अभिनेत्री  म्हणजे कंगना रणौत. कंगना तिची मतं नेहमीच परखडपणे सर्वांसमोर मांडते. फक्त बॉलिवूड आणि अभिनयाचा विचार न करती ती सामाजिक, राजकीय अशा विषयांवरही बिनधास्तपणे बोलते. अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानामुळे ती चर्चेचा विषयही ठरते. बी-टाउनमध्ये 'क्वीन' म्हणूनच तिची ओळख आहे. या क्विनने बॉलिवूडमध्ये स्वत:च्या बळावर तिचं अस्तित्व निर्माण केलं आहे. ज्या मुंबईमध्ये घर घेणं स्वप्न असतं तिथे कंगणाने इमारत विकत घेतली आहे. 

2006 मध्ये 'गॅंगस्टर' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून नाव कमावलं. तिला अभिनय क्षेत्रात 15 वर्षे पूर्ण झाली असून आता ती दिग्दर्शन क्षेत्रातही उतरली आहे. मागिल वर्षी हिट ठरलेल्या 'मणिकर्णिका' या चित्रपटाचं दिग्दर्शनही तिनेच केलं होतं. चित्रपट निर्मिती क्षेत्रात आता ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. एक पाऊल पुढे टाकत ती 'मणिकर्णिका फिल्‍म्‍स' या संस्थेची निर्मिती करत आहे. मुंबईच्य़ा पाली हिल परिसरात कंगणाने एका दिमाखेदार इमारत विकत घेतली आहे. त्याचे फोटो कंगणाची बहिण रंगोली हिने ट्विटरवर शेअर केले आहेत. 

हे ट्विट करताना तिने बाकीच्या कलाकारांना टोला दिला आहे. रंगोलीने ट्विटमध्ये लिहिलं आहे, ' मुंबईच्या पाली परिसरातील हे अपार्टमेंट कंगणाने तिच्या स्टुडिओसाठी घेतलं आहे. याचं स्वप्न तिनं 10 वर्षांपूर्वी पाहिलं होतं. कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला न जाता, कोणत्याही चिंधी ब्रॅंडची जाहिरात न करता किंवा कोणाच्याही लग्नामध्ये न नाचता तिने हे यश संपादन केलयं.'' 

कंगणाची बहिण रंगोलीने ट्विट करत तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तिचा भाऊ अक्षित हे स्टुडिओ सांभाळणार आहे. कंगणा 'नेपोटिझम' च्या विषयी नेहमीच खुलेपणाने बोलते. आज तिने मेहनत करुन यश कमावलं आहे आणि सिद्ध करुन दाखविले आहे. 

कंगणाचा 'पंगा' हा चित्रपट 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील बायोपिकमध्येही कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'थलायवी' असं त्या सिनेमाचं नाव असून त्याचा पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT