Kantara makers face plagiarism allegations, Thaikkudam Bridge seeks legal action Google
मनोरंजन

Kantara: रेकॉर्ड ब्रेक कमाई करणारा 'कांतारा' कसा अडकला वादात? निर्मात्यांवर होतोय चोरीचा आरोप...

ब्लॉकबस्टर 'कांतारा' सिनेमा एका गाण्यामुळे अडचणीत सापडल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

Kantara Controversy:कन्नड सिनेमा 'कांतारा' जेव्हापासून रिलीज झाला आहे,तेव्हापासून त्याची जोरदार चर्चा रंगली होती, सिनेमात लोकांचे मनसोक्त मनोरंजन करणारा मसाला भरपूर भरलेला आहे. आणि म्हणूनच सिनेमानं बॉक्सऑफिसवर देखील भरघोस कमाई केल्याचं दिसून आलं. यादरम्यान आता या सिनेमातील एका गाण्यावर वाद पेटला आहे. त्याचं झालं असं की केरळ मधील बॅंड थॅक्कुडम ब्रिजने सुपरहिट 'कांतारा' विरोधात साहित्य चोरीचा आरोप केला आहे. बॅंडने म्हटलं आहे की,कांताराच्या मेकर्सनी सिनेमासाठी त्यांच्या एका नवरसम गाण्याची चोरी केली आहे.(Kantara makers face plagiarism allegations, Thaikkudam Bridge seeks legal action)

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बॅंडने दावा केला आहे की, सिनेमातील वराह रुपम हे गाणं त्यांच्या नवरसम गाण्याची कॉपी आहे. आरोप करताना म्हटलं गेलं आहे की, ''आम्ही आमच्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की थॅक्कुडम ग्रुप कोणत्याही पद्धतीनं 'कांतारा' सिनेमाशी जोडला गेलेला नाही. त्यामुळे आमचं नवरसम हे गाणं आणि सिनेमातील वराह रुपम गाण्यातील समानता पाहता कॉपीराइटच्या अॅक्टचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट होत आहे''.

आरोपात पुढे म्हटलं गेलं आहे की, ''आमच्या गाण्यापासून प्रेरित होत बनवलेलं गाणं हे स्पष्ट करत आहे की ही साहित्य चोरी आहे. त्यामुळे आम्ही सिनेमाच्या क्रिएटिव्ह टीम विरोधात कारवाईची मागणी करणार आहोत. कारण आम्हाला कुठेही क्रेडिट दिलेलं नाही, ना यांसदर्भात आमची परवानगी घेतलेली आहे. सिनेमाच्या मेकर्सनी संपूर्ण गाणं त्यांचंच आहे असं दाखवलं आहे,जे पूर्णपणे चुकीचं आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात गणेशभक्तांचा उत्साह

SCROLL FOR NEXT