Karan Johar cried after Alia Bhatt told him she was pregnant Google
मनोरंजन

Alia Bhatt Pregnancy: 'आणि मी रडलो...', करण जोहरनं सांगितला 'तो' भावूक क्षण

जून महिन्यात आलियानं प्रेग्नेंट असल्याचं सांगितल्यावर अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

प्रणाली मोरे

2022 च्या जून महिन्यात आलियानं(Alia Bhatt) तिच्या चाहत्यांना चांगलं सरप्राइज दिलं ते ती प्रेग्नेंट(Pregnant) आहे ही गोड बातमी देऊन. रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. एप्रिल 2022 मध्ये दोघांचं मोजक्याच नातेवाईक,मित्र-परिवाराच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली होती. प्रेग्नेंसीची बातमी जशी आलियानं दिली तसं लगेचच तिच्यावर सेलिब्रिटींनीही अभिनंदनाचा वर्षाव करायला सुरुवात केली. चाहते देखील आलिया-रणबीरच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. करण जोहर (Karan Johar) आलियाला आपली मुलगीच मानतो,तो तर चक्क जेव्हा त्याला आलियानं आई होणार असल्याचं सांगितलं तेव्हा रडायला लागला होता. त्याच्यासाठी तो खूप भावूक क्षण होता.(Karan Johar cried after Alia Bhatt told him she was pregnant)

एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना करण म्हणाला की,''आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकल्यावर मी रडायला लागलो. ती माझ्या ऑफिसमध्ये आली होती. मला आठवतंय की,त्या दिवशी माझे केस चांगले सेट होत नव्हते म्हणून मी हुड्डी घालून त्यावर कॅप घालून बसलो होतो. आणि तिनं मला ही बातमी दिली. माझी पहिली रिअॅक्शन होती ती म्हणजे डोळ्यातून माझ्या आनंदाश्रू वाहू लागले, आणि तिनं मला घट्ट मिठी मारली. मी म्हटलं की मला विश्वास बसत नाही की तू आता आई होणार आहेस,तुला बाळ होणार आहे. मला असं वाटलं की तुमच्या बाळाला आता बाळ होतंय,तो आनंद काही औरच. तो खूपच भावनिक क्षण होता. आणि आताही तो आहे. मी आलियाच्या बाळाची प्रतिक्षा करतोय''.

आलियाच्या सिनेइंडस्ट्रीतील करिअर विषयी बोलताना करण म्हणाला,''मला तिचा खूप अभिमान आहे. मी तिच्यासाठी तिच्या पालकांसारखाच आहे. मी तिला माझ्या मुलीसारखंच नेहमी वागवलं आहे. जेव्हा ती 17 वर्षांची होती,तेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये आली होती. आज ती 29 वर्षांची आहे, गेल्या 12 वर्षात आमचं नातं खूप चांगल्या पद्धतीनं वाढत गेलं स्ट्रॉंग बॉन्ड आम्ही शेअर केलं. ही सगळी वर्ष आमच्यासाठी मॅजिकल होती. आता आलियाच्या बाळाला हातात कधी घेतोय त्या क्षणाची वाट मी पाहत आहे. माझ्या मुलांना जेव्हा मी पहिल्यांदा हातात घेतलं होतं तेव्हा जशा भावना मनात दाटून आल्या होत्या अगदी तशाच भावना आलियाच्या बाळाला हातात घेतल्यावर माझ्या असणार आहेत''.

आलियाच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर सध्या ती तिच्या हॉलीवूड सिनेमाच्या शूटिंगसाठी पोर्तुगालमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया करण जोहर, करिना कपूर,मनिष मल्होत्रा यांना लंडनमध्ये भेटली होती. करण जोहर देखील आपल्या 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सिझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच करणने आपल्या शो ची खास झलक चाहत्यांना सोशल मीडियावर दाखवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT