Karan Johar to release Ananya Pandey and Vijay Deverakonda starrer Liger A day before in south than hindi  Google
मनोरंजन

Bollywood Boycott ला घाबरला करण जोहर, 'लाइगर' साठी घेतला मोठा निर्णय...

लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधनची बॉक्सऑफिसवरील अवस्था पाहता करणने आधीपासूनच सावधानता बाळगत शक्कल लढवली आहे.

प्रणाली मोरे

Liger: अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda)आणि अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya pandey) यांच्या आगामी 'लाइगर' सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. सिनेमाच्या रिलीजला काहीच दिवस उरले आहेत. अशातच सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनची देखील आधीपासूनच चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांत आमिर खानच्या लाल सिंग चड्ढासोबत अक्षयच्या रक्षाबंधन सिनेमाला बॉक्सऑफिसवर मोठं नुकसान भोगावं लागलं आहे. अशात बोललं जात आहे की करण जोहरने(Karan Johar) लाइगर सिनेमाविषयी याच भीतीनं एक मोठा निर्णय घेतला आहे.(Karan Johar to release Ananya Pandey and Vijay Deverakonda starrer Liger A day before in south than hindi)

लाइगर सिनेमा २५ ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. याचं प्रमोशन खूप मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे.अनन्या आणि विजय, देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. यादरम्यान आता एक बातमी कानावर पडतेय की करण जोहर 'लाइगर' सिनेमाच्या साऊथ व्हर्जनला हिंदीच्या एक दिवस आधीच रिलीज करण्याचा विचार करत आहेत. बोललं जात आहे की,साऊथमधनं चांगले रिव्ह्यूज आणि कलेक्शन झालं की हिंदीच्या कमाईवरही त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो.

लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधनच नाही तर याआधी देखील बॉलीवूडच्या काही सिनेमांना बॉयकॉटचा सामना करावा लागला आहे. अशात बोललं जात आहे की,करण जोहर 'लाइगर'च्या बॉक्सऑफिस कलेक्शनसाठी खूपच चोख प्लॅनिंग करत आहे. आणि यामुळेच त्यानं सिनेमासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, २५ ऑगस्ट रोजी 'लाइगर'च्या हिंदी व्हर्जनचा केवळ एकच पेड प्रीव्ह्यू शो ठेवला जाईल. या सिनेमाविषयी आणखी एक बातमी कानावर पडतेय की, १४० मिनिटाच्या सिनेमाचे जवळ-जवळ ६ ते ७ शब्द सेन्सॉर बोर्डाने म्यूट करण्याचे आदेश दिले आहेत. या सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग २१ ऑगस्ट पासून सुरु केलं जाईल.

केआरके जो नेहमीच सोशल मीडियाचा समिक्षक म्हणून स्वतःला भूषवतो आणि सगळ्या बॉलीवूडच्या सिनेमांवर छडी उगारताना दिसतो त्यानं करण जोहरच्या या लाइगर सिनेमाविषयी दावा केला होता की, या सिनेमासाठी मोठी रक्कम मोजायला कोणतंच ओटीटी प्लॅटफॉर्म तयार होत नाही. हा सिनेमा डिझास्टर असणार. केआरके नं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की,करण जोहरने लाइगर संदर्भात ओटीटी कंपन्यांशी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला पण कोणीच मागितलेली मोठी रक्कम मोजायला तयार नाही. विजयनेच सिनेमासाठी ३५ करोड रुपये घेतले पण सिनेमा २० ते २० करोडचाच बिझनेस करेल. पण सिनेमाला फायदा कमावण्यासाठी १५० करोडचं कलेक्शन करावं लागले. करण ते जाहिर करेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT