Kartik Aryan News esakal
मनोरंजन

Kartik Aryan: सेकंड नव्हे तर थर्ड हँड 60 हजाराच्या गाडीतून 'रेड कार्पेटवर'!

बॉलीवूडचा सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या कार्तिक आर्यननं त्याची एक जुनी आठवण सांगितली आहे.

युगंधर ताजणे

Kartik Aryan: बॉलीवूडचा सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या कार्तिक आर्यननं त्याची एक जुनी आठवण सांगितली आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या वेगवेगळ्या आठवणी, त्याचा संघर्ष, प्रेरणादायी प्रवास याविषयी चाहत्यांना कुतूहल (Bollywood Actors) असते. एखाद्या शोमध्ये जेव्हा ते सेलिब्रेटी त्याबद्दल सांगतात तेव्हा अनेकांना मोलाचे मार्गदर्शनही वाटते. अशीच एक आठवण कार्तिक आर्यननं सांगितली आहे. ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात कार्तिक (Bollywood News) आर्यन म्हणतो, सुरुवातीला माझ्याकडे पैसे नसायचे, मोठमोठ्या रेड कार्पेट शोमध्ये जायची वेळ यायची तेव्हा मला लाजल्यासारखे व्हायचे कारण माझ्याकडे गाडी नव्हती.

कार्तिकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्याचा एक जुना किस्सा (Kartik Aryan News) व्हायरल केला आहे. त्यात त्यानं प्यार के पंचनामाला मिळालेल्या सक्सेसनंतरच्या गोष्टींना उजाळा दिला आहे. माझ्याकडे पैसेच नव्हते. तेव्हा मला त्या कार्यक्रमांममध्ये जाताना कमालीचं वाईट वाटायचं. भुलभुलैय्यानंतर अभिनेता (Trending News) कार्तिकच्या वाट्याला लोकप्रियता आल्याचे दिसून आले आहे. त्याला आता आर्यन सुपरस्टारच्या नावानं ओळखले जात आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं मोठी बाजी मारली आहे. टॉलीवूडच्या चित्रपटांना धक्का देत यश मिळवलं आहे. आता कार्तिक आर्यन बॉलीवूडमधला टॉपचा अभिनेता झाला आहे.

हे सगळं होत असताना त्याला त्याच्या जुन्या प्रवासातील काही गोष्टी आठवल्या आहेत. त्याविषयी तो म्हणतो, प्यार का पंचनामान मला यश दिलं. लोकप्रियता दिली. त्यानंतर मला वेगवेगळ्या शोसाठी निमंत्रणं यायला लागली होती. मात्र त्या शोमध्ये जाण्यासाठी माझ्याकडे गाडी नव्हती. अशावेळी मी 60 हजारांची एक जुनी गाडी घेतली. त्यापूर्वी मी रिक्षातून अॅवॉर्ड शोला जात होतो. हे माझ्यासाठी खूपच वाईट होतं. पण पैसे नसल्यानं मी दुसरं काय करु शकणार होतो. बऱ्याचदा मी कुणाकडे लिफ्ट मागून त्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याचे कार्तिकनं सांगितलं आहे.

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यननं त्याविषयी सविस्तरपणे सांगितलं आहे. कधी रिक्षा तर कधी कुणाच्या दुचाकीवरुन मी त्या कार्यक्रमांना गेलो आहे. आज हे मी चाहत्यांना सांगितलं तर त्यांना विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT