Kaun Banega Crorepati 14: Aamir Khan to join Amitabh Bachchan for the 1st episode sakal
मनोरंजन

KBC 14 : आमिर खानसोबत रंगणार 'कौन बनेगा करोडपती'चा पहिला भाग..

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे चौदावे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नीलेश अडसूळ

KBC 14 : अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या 'कौन बनेगा करोडपती १४'(Kaun Banega Crorepati 14) चा नवा सिझन(New Season) लवकरच सुरु होत आहे. अमिताभ यांनी केबीसी १४ चं शूटिंग देखील सुरु केलं आहे. नवा सिझन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचं वृत्त आहे. अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाशी अगदी पहिल्या सिझनपासून जोडले गेले आहेत. त्यांनी या शो चे 12 सिझन होस्ट केले आहेत. यंदाच्या 14 व्या पर्वाची सुरुवात कशी होणार, या विशेष भागात कोण येणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. अखेर त्याचं उत्तर समोर आलं आहे. पहिल्या बॉलीवुड अभिनेता अमीर खान हॉट सीटवर येणार आहे.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमिर या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर उपस्थित राहणार आहे.

आमिर खान जवळपास चार वर्षांनी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांछे मनोरंजन करायला येत आहे. या चित्रपट अमीर खान आणि करीना कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. अद्वैत चंदन यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अमीर खान किती प्रश्नांची उत्तरं देणार आणि कोणत्या संस्थेसाठी खेळणार हे बघण्यासारखे आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचे उत्तर चुकल्यास स्पर्धकाला 75 लाख रुपये मिळणार आहेत. 8 ऑगस्टपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT