Kaun Banega Crorepati shashwat goel unable to answer 7 crore 50 lakh question,know what is the correct answer
Kaun Banega Crorepati shashwat goel unable to answer 7 crore 50 lakh question,know what is the correct answer Google
मनोरंजन

KBC14: चूक भोवली... नाहीतर सिझनचा पहिला विजेता बनला असता शाश्वत गोयल, काय घडलं नेमकं?

प्रणाली मोरे

KBC14: आत्मविश्वासू असणं चांगलंच आहे पण अति-आत्मविश्वास मात्र तुमचा घात करु शकतो हे देखील तितकंच खरं आहे. असंच काहीसं झालं आहे अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' १४ च्या शो मध्ये. हॉटसीटवर बसलेला शाश्वत गोयल नवी दिल्लीहून या गेम शो मध्ये खेळण्यासाठी सामिल झाला होता. ९ वर्ष सातत्यानं प्रयत्न केल्यानंतर त्याला 'कौन बनेगा करोडपती' शो मध्ये सहभागी होण्याची अन् खेळण्याचीही संधी लाभली पण त्याचा अति-आत्मविश्वासच त्याला घातक ठरला. शाश्वतनं जेवढं कमावलेलं तेवढं सगळं एका सेकंदात गमावलं. (Kaun Banega Crorepati shashwat goel unable to answer 7 crore 50 lakh question,know what is the correct answer)

'कौन बनेगा करोडपती १४' चा एक प्रोमो दोन ते तीन दिवसापूर्वी रिलीज केला गेला. ज्यामध्ये दाखवलं गेलं होतं की नवी दिल्लीच्या शाश्वतनं १ करोड जिंकले आहेत आणि आता तो ७ करोड ५० लाखाच्या प्रश्नासाठी खेळत आहे. त्यानं उत्तराचा एक पर्याय लॉक करण्यासाठी अमिताभ यांना सांगितले. अर्थात त्या प्रोमोत हे दाखवलं नव्हतं की त्यानं ७ करोड ५० लाख जिंकले की नाही. आता नुकताच याचा एपिसोड जेव्हा प्रसारित करण्यात आला तेव्हा खरं काय ते कळलं.

शाश्वत गोयलने दोन एपिसोडमध्येच आपला गेम संपवला. पहिल्या भागात तो ७५ लाखापर्यंत खेळला होता,ज्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यानं ऑडियन्स पोल लाइफलाइन वापरली होती. तर दुसऱ्या भागात त्याच्यासमोर बिग बी यांनी १ करोडचा प्रश्न ठेवला. त्यांनी विचारलं- 'उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील भितरी स्तंभ कोणत्या साम्राज्यातील राजांच्या वंशपरंपरेचं एक महत्त्वाचं स्त्रोत म्हणून ओळखलं जातं?' या प्रश्नाचं अचूक उत्तर देत शाश्वतने १ करोड जिंकले आणि यंदाच्या सिझनचा दुसरा करोडपती बनायचा मान पटकावला.

आता पुढचा प्रश्न १७ वा जो खेळला गेला ७.५ करोड रुपयांसाठी. शाश्वतला विचारलं गेलं की-'कोणत्या ब्रिटीश सैन्याच्या तुकडीला भारतात 'प्राइम्स' हे ब्रीदवाक्य देण्यात आले कारण ती भारतात तैनात केलेली ब्रिटिशांची पहिली सैन्य तुकडी होती?' यासाठी पर्याय होते,A) ४१ रेजिमेंट ऑफ फुट b) पहिली कोल्डस्ट्रीम गार्ड C) पाचवी लाइट इन्फॅंट्री आणि D)39 वी रेजिमेंट ऑफ फुट. आता याचं उत्तर सांगताना शाश्वतने विचार केल्यानंतर 'डी' हा पर्याय निवडला. पण नंतर त्यानं आपलं उत्तर बदलत 'A' हा पर्याय लॉक करायला सांगितला.

अर्थात याआधी अमिताभ यांनी शाश्नतला चेतावनी दिली होती की जर या प्रश्नाचं उत्तर तो चुकला तर थेट ७५ लाखावर त्याची घसरण होईल. पण शाश्वतच्या अति-आत्मविश्वासानं त्याचा घात केला. त्याला वाटलं हा अंदाजानं मारलेला बाण निशाण्यावर लागेल,पण तसं काहीच झालं नाही. शाश्वतचं उत्तर चुकलं आणि त्याचं बरोबर उत्तर जे त्याने आधी सांगितलं होतं तेच होतं म्हणजे D हा पर्याय. पण त्याचं ठाम मत होत नसल्यानं ,विचारांचा गोंधळ डोक्यात सुरू झाल्यानं अंतिम निर्णय घेताना त्यानं चुकीचा पर्याय निवडला आणि सिझनचा पहिला विजेता बनण्याची संधी त्याची हुकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT