KBC- Akshay Kumar teaches self defence to woman in amitabh kaun banega crorepati. Google
मनोरंजन

KBC च्या मंचावर अक्षयला पाहून किंचाळत धावत सुटली स्पर्धक..अमिताभही झाले हैराण..

केबीसी चा एक नवा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

KBC: केबीसीच्या मंचावर लवकरच बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार आलेला लवकरच पहायला मिळणार आहे. अमिताभच्या शो मध्ये येऊन अक्षय कुमार महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देताना दिसणार आहे. कौन बनेगा करोडपतीचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकाल की अमिताभ बच्चन अक्षय कुमारला सांगतात की तो महिलांना स्वसंरक्षण कसं करावं याचं ज्ञान देऊ शकतो का?(KBC- Akshay Kumar teaches self defence to woman in amitabh kaun banega crorepati)

अमिताभ यांनी विनंती केल्यामुळे अक्षय कुमारनं महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. तो म्हणाला-''तुम्हाला कदाचित हसू येईल...पण जोरजोरात ओरडणं हा सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा उपाय आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी. अक्षयनं या टेक्निकला एका महिलेसोबत प्रॅक्टिकली करुनही पाहिलं. प्रेक्षकांना दाखवण्यासाठी अक्षय जसा त्या महिलेच्या दिशेनं चालू लागतो,तेव्हा ती जोरजोरात ओरडू लागते. अक्षयनं सर्वच महिलांना स्वसंरक्षणासाठी ही प्राथमिक टेक्निक उपयोगात आणण्याचा सल्ला दिला''.

केबीसीच्या मंचावर सेल्फ डिफेंस शिकवताना अक्षय पुढे म्हणाला-''सेल्फ डिफेन्सची आणखी एक पद्धत म्हणजे निरिक्षण. तुम्ही जर रात्रीचं कुठे जात असाल तर शांत ठिकाणच्या एरियात अलर्ट असायला हवं...तुम्ही जिथे चालत आहात..तिथे जवळपास दरवाजा आहे की खिडकी,कुठे काही पडलं आहे का..आपल्या आजुबाजूच्या सगळ्या वस्तूंचं निरिक्षण करायला शिकलं पाहिजे''.

अक्षय जेव्हा महिलांना सेल्फ डिफेन्स शिकवत होता तेव्हा पूर्ण स्टुडिओत शांतता पसरली होती.सगळेच अक्षयला एकचित्तानं ऐकत होते. शो च्या या प्रोमो व्हिडीओला खूप पसंत केलं जात आहे. अक्षयने ज्या पद्धतीनं महिलांना सेल्फ डिफेन्सचे धडे दिले ते नक्कीच सगळ्या महिलांच्या कामी येतील.

हेही वाचा:जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर सध्या बॉक्सऑफिसवर त्याची जादू चालेनाशी झालीय. बॅक टू बॅक त्याच्या सिनेमांवर फ्लॉपचा शिक्का बसतोय. सम्राट पृथ्वीराज,रक्षाबंधन,रामसेतू सारख्या सिनेमांची कमाई ना के बराबर राहिली. आता अक्षय कुमार सेल्फी सिनेमात दिसणार आहे. त्या व्यतिरिक्त गोरखा सिनेमात देखील तो दिसणार आहे. आता पहायचं त्याचे आगामी सिनेमे बॉक्सऑफिसवर काय कमाल करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Crime: नांदेडमध्ये मध्यरात्री तलवारी खंजरने हल्ला; २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

Mahavitaran Recruitment : विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; ६ व ७ नोव्हेंबरला कागदपत्रांची पडताळणी

Kolhapur Election : 'पदवीधर'ची बाजारात 'तुरी', महायुतीत वादाची 'धुरी'; मंत्री चंद्रकांत पाटील-हसन मुश्रीफ यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा

Raju Shetti: ‘दालमिया’कडून एफआरपीमध्ये मोडतोड: राजू शेट्टी : उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार

Latest Marathi News Live Update : अफगाणिस्तानात ६.३ तीव्रतेचा भूकंप, ७ जणांचा मृत्यू, भारतापर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT