Sushil Kumar was the first person to win Rs 5 crore on KBC. Google
मनोरंजन

KBC मध्ये 5 करोड जिंकणाऱ्या सुशील कुमारची दुर्दशा नेमकी कोणामुळे?म्हणाला...

सुशील कुमार यांन एका मुलाखतीत आपल्या वाट्याला आलेल्या अपयशाचं खापर चक्क मीडियावर फोडलं आहे.

प्रणाली मोरे

2011 साली 'कौन बनेगा करोडपती मध्ये'(Kaun Banega Crorepati) ५ करोड जिंकून इतिहास रचलेला सुशील कुमार(Sushil Kumar) आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल कदाचित. IAS बनण्याचं स्वप्न मनात बाळगून असणाऱ्या सुशील कुमारनं करोडपती बनल्यानंतरही आपल्या आयुष्यात खूप उतार-चढाव पाहिले. इतकंच नाही तर त्याचं IAS होण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालेलं नाही. आता एका मुलाखतीत सुशीलने आपलं शिक्षण पूर्ण न होण्याच खापर मीडियावर फोडलेलं आहे. काय म्हणालाय सुशील कुमार?(KBC winner Sushil Kumar says ‘media exposure irritated’)

एका इंग्रजी वेबसाईटल्या दिलेल्या मुलाखतीत सुशील कुमार म्हणाला आहे-'' लोक केबीसी मध्ये जातात ते एकतर पैसे जिंकून आपलं नशीब बदलण्यासाठी किंवा मग अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांना भेटण्यासाठी. मी तिथे गेलो होतो कारण मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. हे खरंय की अमिताभ यांचा मोठा चाहता होतो. मी तेव्हा शासकीय नोकरीसाठी एका परिक्षेची तयारी करीत होतो. त्यामुळे मी केबीसीत जाण्याचा निर्णय घेतला. कारण माझा तसाही अभ्यास सुरू होता जनरल नॉलेजचा. पण केबीसी मध्ये पाच करोड जिंकल्यानंतर मीडियानं इतकं मला एक्सपोजर दिलं की त्यामुळे मी हैराण झालो होतो''.

''ते सगळे माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयीही जाणून घ्यायला उत्सुक होते. माझ्यावर त्यावेळी मीडियाचा मोठा प्रभाव पडला होता. मी प्रत्येक गोष्ट करण्याआधी विचार करायचो की मीडिया काय म्हणेल? शेवटी अभ्यास करताना तुम्हाला शांतत,एकाग्रता हवी असते. मी मीडियाच्या एक्सपोजरच्या दबावाखाली आलो होतो,आणि मला माझ्या अभ्यासावर त्यामुळे पूर्ण लक्ष देता आलं नाही. माझं लक्ष कायम विचलित व्हायचं. माझ्याबद्दल नेहमी लिहिलं जायचं. पण जेव्हा माझ्याबद्दल उगाच खोटं काहीतरी लिहिलं जायचं तेव्हा मला त्यावर नेहमी स्पष्टिकरण द्यायला लागायचं. त्यामध्ये माझी ४-५ वर्ष वाया गेली''.

आजकाल टी.व्ही वर चॅनल टीआरपी वाढवण्यासाठी इमोशनल स्टोरीजवर जास्त लक्ष केंद्रित करतात या मुद्दयावर सुशील कुमार म्हणाला की,'' लोक स्मार्ट आहेत पण तरिही खोट्या गोष्टींना खरं समजतात''. सुशील कुमार विषयी बोलायचं झालं तर त्यानं केबीसीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. २०२० मध्ये त्यानं फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं की केबीसीमध्ये जिंकल्यानंतर बिहारमध्ये त्याला लोक सेलिब्रिटी समजू लागले होते. कितीतरी कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं जायचं. आणि या सर्व कारणांमुळे त्याचा अभ्यास मागे पडत गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT