kedar shinde shared a post about shivsena Babasaheb Thackeray and shahir sable
kedar shinde shared a post about shivsena Babasaheb Thackeray and shahir sable  sakal
मनोरंजन

केदार शिंदे : बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे यांचेही कॉल झाले होते टॅप..

नीलेश अडसूळ

Entertainment news : दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. केदार शिंदेंकडे अनुभवांचा खजीना आहे. त्यांच्याशी गप्पा करताना ते अनेक किस्से रंगवत असतात. लोककला, नाटक, चित्रपट आणि मैत्रीचे त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अशीच एक आठवण त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. आज चक्क त्यांनी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे यांच्या आठवणी जागवल्या आहेत. (kedar shinde shared a post about shivsena Babasaheb Thackeray and shahir sable)

केदार शिंदे यांच्या पोस्ट मागे एक महत्वाचे कारण म्हणजे आज १९ जून, शिवसेना पक्षाचा वर्धापन दिवस. शिवसेना आणि शाहीर साबळे यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. बाळासाहेब आणि शाहीर साबळे यांचे मैत्रीचे संबंध होते, पण पुढे ते तसे राहिले नाही. या सर्व घडामोडींची माहिती देणारी एक खास पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे. ते म्हणतात, 'आज शिवसेनेचा स्थापना दिवस...जून्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या...ठाकरेकाका ( बाळासाहेब ठाकरे ) यांच बाबांना भेटायला आमच्या घरी येणं...बाबांच मातोश्रीवर वरचेवर जाणं...फोनवरुनही सतत चर्चा करणं..महाराष्ट्रभर आमच्या गाडीने दोघांनीच केलेला दौरा...पश्चीम महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या मोठमोठ्या नेत्यांच्या दहशतीला न जूमानता बाबांनी ठाकरेकाकांच्या ठीकठीकाणी भरवलेल्या सभा...शिवसेनेचा विचार ठामपणे तरुणांपुढे यावा म्हणून निर्माण केलेलं "आंधळं दळतयं " मुक्तनाट्य...'

पुढे ते लिहितात, 'जागृत झालेल्या मराठी तरुणांनी परप्रांतीयांविरुध्द पेटवलेली पहीली दंगल...बाबांचे आणि ठाकरे काकांचे ट्याप होणारं फोन संभाषण...दंगलीनंतर एका प्रसीध्द इंग्रजी दैनीकाने बाबांचा भलामोठा फोटो वर्तमानपत्रात छापून " बाळासाहेबांना गुमराह करणारा हाच तो रक्त पीपासू माणूस " म्हणून केलेली बाबांची नीर्भत्सना...शिवसेनेने राजकारणात पडू नये म्हणून बाबांनी केलेला आटापीटा...ऐशी टक्के समाजकारण आणि वीसटक्के राजकारण हे ब्रीद असलेल्या शिवसेनेच राजकारणातच सक्रीय होणं आणि बाबांच शिवसेनेपासून दूर होणं...आज हे सर्व आठवतय...'

'शेवटपर्यंत शिवसेनेलाच मत देणारे बाबा आणि शेवटपर्यंत साबळे कुटूंबावर प्रेम करणारे ठाकरेकाकाही आठवतायत...पण खंत एकच आहे की शिवसेनेचा इतिहास लीहीला जाईल तेंव्हा त्यात बाबांच्या योगदानाचा उल्लेख नसेल...मात्र बाबांना श्रध्दाजली वाहाताना उध्दव ठाकरे याचा उल्लेख करायला विसरले नाहीत हे ही कमी नाही...आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी आमच्या कुटुंबाबरोबर तसच स्नेहपुर्ण नात टिकवून ठेवलय...शिवसेना शतायु होवो...मराठी आणि शिवसेना हे समीकरण आबाधीत राहो....."जय महाराष्ट्र.' अशी खास आठवण केदार यांनी सांगितली आहे तर ही शाहीर साबळे यांच्या कन्या वसुंधरा साबळे यांनी लिहून ठेवली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT