kedar shinde shared post about shahir sable bought first radio for wife bhanumati
kedar shinde shared post about shahir sable bought first radio for wife bhanumati  sakal
मनोरंजन

अरे संसार संसार.. केदार शिंदेंनी सांगितली घरातील पहिल्या रेडिओची आठवण..

नीलेश अडसूळ

Entertainment news : दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. केदार शिंदेंकडे अनुभवांचा खजीना आहे. त्यांच्याशी गप्पा करताना ते अनेक किस्से रंगवत असतात. लोककला, नाटक, चित्रपट आणि मैत्रीचे त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. अशीच एक आठवण त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये शाहीर साबळे यांच्या घरात पहिला रेडिओ कसा आला हे सांगितले आहे.

केदार शिंदे लिहीतात, 'अरे संसार संसार....मुंबईत शाहीरांनी बिर्हाड थाटल..आता इथे जम बसवण्यासाठी आहोरात्र कष्ट करण्याची गरज होती..आता कष्ट करायचे ते कलेच्या क्षेत्रातच हे त्यांनी आणि भानुमतीने पक्क ठरवल होत..त्याकाळी एच.एम.व्हि.कंपनी मराठी गीतांच्या रेकॉर्ड्स काढत असे..रेडीयोस्टेशन वरुनही लाईव्ह गाणी सादर होत असत पण रेडीयोस्टेशनला आवाजाची परीक्षा द्यावी लागे..शाहीर या परीक्षेत पास झाले आणि त्यांची गाणी रेडीयोवर येऊ लागली..'

पुढे ते लिहीतात, 'महाराष्ट्रातील लोकसंगीत रेकॉर्ड व्हाव ही शाहीरांची इच्छा होतीच पण भानुमतीही त्यांच्या आवाजाच्या धाटणीची गीतरचना करु लागली होती..शाहीरांच्या गाण्याच्या रेकॉर्ड्स नीघू लागल्या आणि रेडियोवर वाजायलाही लागल्या पण मुंबईत बस्तान बसवताना आणि चार मुलांचा सांभाळ करत कुटूंबाचा खर्च भागवताना चैनीच्या वस्तू घेण केवळ अशक्य होत पण आता कमीत कमी एक रेडियोतरी घरात असावा असा हट्टच भानुमतीने धरला..शाहीरांनाही त्याची गरज भासत होतीच आणि मग खर्चात तडजोड करत पहिला रेडियो घरात आला..''

'रेडियो पाहून भानुमती हरखून गेली..तीच्या संसारातली पहिली चैनीची गोष्ट होती ती..शाहीरांनाही रेडियोसह भानुमतीचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही..ओळखीच्या फोटोग्राफर मीत्राकडून क्यामेरा आणून त्यांनी भानुमतीची रेडियोसहीत ही छबी आपल्या आठवणीत बंदिस्त करुन ठेवली..' शाहीर साबळे यांच्या संसारातील ही खास आठवण शाहीरांची मुलगी वसुंधरा साबळे यांनी लिहीली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT