RRR And KGF Chapter 2 Release dates... Google
मनोरंजन

ओटीटी वर RRR आणि KGF 2 एकामागून एक धडकणार; जाणून घ्या प्रदर्शनाच्या तारखा

KGF 2 आणि RRR सिनेमानं जगभरात बॉक्सञऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आता ओटीटी वर सिनेमा पाहण्यासाठीही तेवढीच उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.

प्रणाली मोरे

कन्नड सुपरस्टार यशचा(Yush) केजीएफ चॅप्टर 2(KGF Chapter 2) सिनेमा बॉक्सऑफिसवर(boxoffice) एकामागून एका रेकॉर्ड तोडत आहे. श्रीनिधी शेट्टी,संजय दत्त आणि रविना टंडन सारख्या स्टार्सच्या अभिनयानं सजलेला केजीएफ 2 आता ओटीटीवर कधी येतोय याची सारे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पहात आहेत. आता या सिनेमाच्या बाबतीत एक गूडन्यूज कळाली आहे. बोललं जात आहे की केजीएफ 2 सिनेमाचे डिजिटल राइट्स करोडोला विकले गेलेयत. त्यामुळे हा देखील मोठा रेकॉर्ड आहे. पण याहूनही मोठी बातमी अशी आहे की RRR आणि KGF2 आता पाठोपाठ ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

मीडिया रीपोर्ट्सनुसार केजीएफ 2 सिनेमाची डिजिटल डील जवळपास 320 करोडोंना झाली आहे. 27 मे,2022रोजी हा सिनेमा ओटीटीवर स्ट्रीम केला जाईल अशी बातमी आहे. मात्र अद्याप अधिकृतरित्या या सिनेमाच्या रिलीज डेटविषयी सांगितले गेले नाही. केजीएफ सिनेमा प्रदर्शित होऊन आता 21 दिवस झाले आहेत. या 21 दिवसांत केजीएफ 2 ने वर्ल्डवाईड 1054.85 करोड रुपयांची कमाई केली आहे. तर हिंदी व्हर्जनसाठी हा आकडा जवळपास 373.30करोड पर्यंत पोहोचला आहे. केजीएफ चॅप्टर 2 ने आतापर्यंत 752.9 करोडची कमाई केली आहे. आणि अजूनही या सिनेमाची घोडदौड बॉक्सऑफिसवर सुरूच आहे.

एस.एस.राजामौली यांच्या आरआरआर सिनेमाच्या रिलीज डेटचा देखील खुलासा झाला आहे. 1100 करोडपेक्षा जास्त कमाई करणारा आरआरआर झी5 आणि नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मीडिया रीपोर्ट्सनं दावा केला आहे की आरआरआर 20 मे, 2022 रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्षलमुक्त बस्तरमध्ये शूर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी; म्हणाले- देशासाठी जवानांचे योगदान अतुलनीय

IND U19 vs PAK U19, Live Streaming: भारताने जिंकला टॉस! पाकिस्तानचे हिशेब चुकते करण्याची संधी, Playing XI मध्ये द्रविड-सेहवाग

'माझी तुम्हाला विनंती नाहीतर तो...' रामायणबद्दल बोलताना सनी देओल बोलला की, 'बॉलिवूडसारख्या..'

Mumbai News: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर महापालिकेचा अ‍ॅक्शन मोड, अंधेरीत बेकायदा हॉटेलांवर हातोडा

Latest Marathi News Live Update: 'अब्दुल' एक दिवस उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारताचा पंतप्रधानही बनेल..."- वारिस पठाण

SCROLL FOR NEXT