KGF 3 Teaser Esakal
मनोरंजन

KGF 3 Teaser: समुद्रात रॉकी भाई नाय..मग गेला कुठे? KGF 3 चं ठासू टिझर रिलिज...

Vaishali Patil

प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफच्या दोन्ही चित्रपटांनी बॉलीवूडला मोठा धक्का दिला आहे.कन्नड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत, यशच्या KGF आणि KGF Chapter 2 ने मनोरंजन सृष्टीला पार हादरुन सोडलं.

तब्बल तीन वर्षानंतर केजीएफचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. KGF Chapter 2 गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी रिलीज झाला होता, तेव्हापासून चाहते त्याच्या पुढच्या भागाची म्हणजेच KGF चॅप्टर 3 ची वाट पाहत आहेत.

यशचे चाहतेही त्याला वारंवार या चित्रपटाच्या तिसऱ्या भाग कधी येणार याबद्दल विचारत असतात. आता KGF Chapter 2 ला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे, रॉकी भाईच्या पुनरागमनाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. होय आता KGF Chapter 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

KGF 2 च्या पोस्ट क्रेडिट सीनने कल्पना दिली की प्रशांत नील KGF: Chapter 3 साठी तयारी करत आहे. पण क्लायमॅक्स सीनमध्ये रॉकीला समुद्रात बुडताना पाहून प्रत्येक चाहत्याची स्वतःची थिअरी तयार केली होती.

मात्र आता शुक्रवारी, चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, निर्मात्यांनी 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये असा इशारा दिला आहे, ज्यामुळे संपूर्ण कथा बदलून जाणार आहे.

ट्विट करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की , 'सर्वात शक्तिशाली माणसाने दिलेले सर्वात शक्तिशाली वचन.'

थोडक्यात सांगायचं झालं तर KGF Chapter 2 मध्ये जेव्हा काळ्या पडद्यावर 1978 ते 1981 पर्यंत स्क्रीन अचानक गायब झाली. त्यानंतर रॉकी एका मोठ्या बाटलीतून वाइन पीत त्याच्या राज्याकडे कोलार गोल्ड फील्ड्सकडे सरळ पाहताना दिसतो.

त्यावेळी या चार वर्षांत रॉकीने काय केले, हा प्रश्न आहे. KGF: Chapter 3 ची कथा या चार वर्षांच्या आसपासच फिरेल असा काहीसा खुलासा निर्मात्यांनी केला आहे.

काही रिपोर्ट्सनुसार KGF 3 चे शूटिंग 2025 मध्ये सुरू होईल. यशचा हा 19 वा चित्रपट असेल. 14 एप्रिल 2022 रोजी रिलीज झालेल्या 'KGF: Chapter 2' ने बॉक्स ऑफिसवर खरोखरच तुफान गाजवला. या चित्रपटाने जगभरातील चित्रपटाने 1250 कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

आता KGF 3 ची घोषणा झाल्यापासून चाहते खूप खूश आहेत. या चित्रपटाचे नाव सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ट्विटरवर यूजर्स वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. काहीजण याला रॉकी भाईचे दमदार पुनरागमन म्हणत आहेत, तर काहीजण या टीझरला चिलिंग म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT