KGF Yash Refused to role Ravana Character Ramayana  esakal
मनोरंजन

Yash In Ravana Role : 'रावणाची भूमिका नकोच!', KGF च्या यशनं सांगितलं कारण...

दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आणि मधू मंटेना यांच्या रामायणावर आधारित चित्रपटाची सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे.

युगंधर ताजणे

KGF Yash Refused to role Ravana Character Ramayana : एकीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुषची चर्चा होत असताना दुसरीकडे आणखी एका दिग्दर्शकाच्या रामायणावर आधारित चित्रपटाविषयी बोललं जात आहे. त्यामध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे तर सीतेच्या भूमिकेत आलिया भट्ट दिसणार असल्याची चर्चा आहे. KGF Yash Refused

दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आणि मधू मंटेना यांच्या रामायणावर आधारित चित्रपटाची सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते आहे. यामध्ये आता केजीएफचा अभिनेता यश हा रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यानं आपण ही भूमिका करणार नसल्याचे म्हटले आहे. टॉलीवूडच्या यशनं केजीएफमधून देशभरातल्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रशांत नीलच्या केजीएफच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सध्या पौराणिक कथांवर आधारित चित्रपटांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात आहे. त्याला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. अशातच सध्या पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या आदिपुरुषविषयी सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्यात रामयणावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

रावणाच्या भूमिकेत जेव्हा टॉलीवूडच्या यशचे नाव समोर आले त्यावेळी चाहत्यांना कमालीचा आनंद झाला. एक मोठी भूमिका यशच्या वाट्याला आल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता त्यानं ही भूमिका करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येतंय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामाच्या तुलनेत रावणाची भूमिका अधिक आव्हानात्मक असल्यानं यशला ही मोठी संधी असल्याचे बोलले जात होते. मात्र आता त्यानं ही भूमिका करण्यास नकार दिला आहे.

का दिला नकार?

असं म्हटलं जात आहे की, यशच्या टीमनं त्याला ही भूमिका करण्यास नकार दिला आहे. त्यानं दिलेल्या सल्ल्यामुळे यश हा आता रावणाच्या भूमिकेत दिसणार नाही. असे म्हटले जात आहे. जर यशनं ही भूमिका साकारली तर त्याच्याविषयी नकारात्मकता चाहत्यांमध्ये पसरू शकते. असा बोललं जातंय. त्याच्या चाहत्यांना त्यानं रावणाची भूमिका करणे ही आवडणारी बाब नाही. त्यामुळे त्याला असं सांगण्यात आले आहे की, त्यानं ही भूमिका करु नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT