Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding updates Google
मनोरंजन

Kiara-Sidharth च्या प्री-वेडिंग फंक्शनची तयारी सुरु..'या' रॉयल अंदाजात होणार लग्नस्थळी पाहुण्यांचे स्वागत

राजस्थानमध्ये जैसलमेर शहरात सूर्यगढ पॅलेसमधील हॉटेलमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्न करणार आहेत.

प्रणाली मोरे

Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding updates: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी गेल्या काही वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलीवूडचं हे क्यूट कपल आता ६ फेब्रुवारी,२०२३ रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळत आहे.

या कपलने अद्याप लग्नाविषयी बोलणं टाळलं असलं तरी पण यांच्या लग्नाची बातमी अफवा मुळीच नाही.. ते खरोखरच लग्न करत आहेत. आता लग्नासंबंधित सोहळे सुरु व्हायला केळ दोन दिवस राहिले आहेत. तेव्हा या लग्नसोहळ्याचे काही अपडेट्स समोर आले आहेत.

अर्थात आतापर्यंत आपल्या सगळ्यांना हे तर नक्कीच कळालं असेल की सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी राजस्थानमधील जैसलमेर शहरात एक रॉयल वेडिंग करणार आहेत आणि लग्नस्थळी तयारी सुरू देखील झाली आहे,यासंबंधितच काही नवीन अपडेट्स कळाल्या आहेत.(Kiara Advani & Sidharth Malhotra Wedding updates venue celebration details)

तुमच्या माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नासंबंधित पहिल्या सोहळ्याची सुरुवात ४ फेब्रुवारी,२०२३ रोजी होणार आहे. 'शेरशाह' सिनेमाचं हे कपल जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमधील हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत.

तेथील सर्व रुम्स आतापर्यंत पाहुण्यांसाठी बूक झाल्या आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राला मिळालेल्या माहितीनुसार कळत आहे की, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी कियारा-सिद्धार्थचा संगीत सोहळा असेल. तर ६ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न. आणि सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा रीसेप्शन सोहळा ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडेल.

माहितीनुसार,जैसलमेर मधील सूर्यगढ पॅलेस मध्ये पाहुण्याचं स्वागत आणि मनोरंजन करण्यासाठी कठपुतली आणि मंगनियार परफॉर्मन्सेस देखील होणार आहेत. लग्नात सर्व्ह केल्या जाणाऱ्या जेवणाविषयी बोलायचं झालं तर खास राजस्थानी डिशेससोबत साऊथ इंडियन आणि कॉन्टिनेन्टल पदार्थांची रेलचेल असणार आहे.

पाहुण्यांसाठी कॅमल राइड देखील ठेवण्यात आलेली आहे. सिद्धार्थ सध्या आपल्या कुटुंबासोबत दिल्लीमध्ये आहे,आणि स्वतः लग्नाच्या तयारीकडे लक्ष ठेवून आहे. तर कियारा अद्याप मुंबईत आपल्या वेडिंग संबंधित काही गोष्टींच्या तयारीत बिझी असल्याचं कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd T20I: 'शुभमन पहिल्याच बॉलवर आऊट, त्यानंतर मी...' सूर्यकुमार टीम इंडियाच्या पराभवानंतर काय म्हणाला?

IND vs SA: तब्बल ७ वाईड अन् १३ चेंडूंची एक ओव्हर! अर्शदीपवर प्रचंड भडकला गौतम गंभीर; Video Viral

IND vs SA, 2nd T20I: तिलक वर्मा एकटा लढला, वादळी फिफ्टीही ठोकली; पण टीम इंडिया ऑलआऊट अन् द. आफ्रिकेचा मोठा विजय

Modi hosts Dinner for NDA MPs : मोदींकडून 'NDA' खासदारांसाठी पंतप्रधान निवासस्थानी विशेष भोजनाचे आयोजन

कांदा आता प्रतिक्विंटल सरासरी १५०० रुपये! गुरुवारी सोलापूर बाजार समितीत २०९ गाड्यांची आवक; एक महिन्यात ५० कोटींची उलाढाल

SCROLL FOR NEXT