Kiccha Sudeep believes 'some third person' was behind his Twitter spat with Ajay Devgn Google
मनोरंजन

'Ajay Devgan आणि माझ्यात वाद तिसऱ्या व्यक्तीमुळे',Kiccha Sudeep चा खुलासा

एका कार्यक्रमात किच्चा सुदीपने हिंदी राष्ट्रभाषा नाही असं म्हटल्यानंतर अजय देवगण आणि त्याच्यात ट्वीटर वॉर रंगलं होतं.

प्रणाली मोरे

काही दिवसांपूर्वी पॅन इंडिया फिल्म्सवरनं साउथ विरुद्ध नॉर्थ असा रंगलेला वाद(Controversy) आपल्या सगळ्यांच्या लक्षात अद्याप पर्यंत असेलच. किच्चा सुदीपने(Kiccha Sudeep) हिंदी राष्ट्रभाषा(Hindi Rashtrabhasha) नाही असं म्हणत मोठा प्रश्न निर्माण केला होता. ज्याला उत्तर देताना अजय देवगणने(Ajay Devgan) तिखट प्रतिक्रिया दिली होती. दोघांमध्ये जणू ट्वीटर वॉर छेडलं गेलं होतं. अर्थात या वादावर साऊथ स्टार किच्चा सुदीपने याआधी देखील प्रतिक्रिया दिली होती. पण आता त्यानं यावर जे पुन्हा आपल्याकडून स्पष्टिकरण दिल आहे ते काही केल्या लोकांच्या पचनी पडत नाहीय.(Kiccha Sudeep believes 'some third person' was behind his Twitter spat with Ajay Devgn)

एका मुलाखती दरम्यान किच्चाने या मुद्द्यावर पुन्हा वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला आहे,''माझा हेतू त्यावेळी कोणताही वाद निर्माण करण्याचा नव्हताच मुळी. ते फक्त कोणत्याही कारणाविना उगाच मोठं केलं गेलं''. सध्या किच्चा सुदीप त्याच्या 'विक्रांत राणा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यादरम्यान मीडियाशी साधलेल्या संवादा दरम्यान त्याने पुन्हा अजय देवगणशी झालेल्या ट्वीटर वादावर वक्तव्य केलं आहे. किच्चा म्हणाला आहे की,''आम्ही आजही मित्र आहोत. अजय देवगण एक सज्जन माणूस आहे. आमच्यामध्ये कोणताच वाद नाही. मी तुम्हाला १०० टक्के सांगते ते सगळं फक्त चुकीच्या समजुतीमुळे झालं होतं. अजयने मला ट्वीट केलं पण ते चांगल्या पद्धतीनं त्याने केलं होतं. त्याने पुन्हा मला रीट्वीट करताना म्हटलं,मला माझं उत्तर मिळालं सुदीप,सगळं स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद''.

किच्चाने अजयशी झालेल्या वादावर याआधी देखील म्हटलं होतं की,''त्याने मला एक प्रश्न विचारला आणि मी फक्त त्याचा सम्मान राखत उत्तर दिलं. मग मला उत्तराची अपेक्षा होती ,जे हिंदी भाषेत मला मिळाले. मला हिंदी समजते पण मी इंग्लिशमध्ये उत्तर दिलं,कारण जे मला म्हणायचंय ते सगळ्यांना कळावं हा माझा हेतू होता. अजयने या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढला,पण तो देखील चुकीचा नव्हता,असं होऊ शकतं''. पण किच्चाला अजयनं हिंदीत केलेलं ट्वीट खटकलं होतं,हे मात्र नक्की. पुढे किच्चा म्हणाला की,''मला पूर्ण खात्री आहे की ज्या व्यक्तीला मी ओळखतो तो कधीच हिंदीत ट्वीट करणार नाही. निश्चितपणे यामागे कुणी तिसरी व्यक्ती आहे,त्याचे विचार आहेत. मला तो तिसरा माणूस कोण,कोणाचे ते विचार होते हे जाणून घेण्यात काडीचाही इंट्रेस्ट नाही''.

अजय-किच्चा सुदीप वादाची सुरुवात एका कार्यक्रमापासून झाली होती,ज्यात किच्चानं,'' हिंदी राष्ट्रभाषा नाही असं म्हटलं होतं. बॉलीवूड आता पॅन इंडिया फिल्म बनवत आहे. बॉलीवूड आपल्या सिनेमांना तामिळ,तेलुगूत डब करुन सिनेमे रिलीज करत आहेत पण त्याला हवं तसं यश मिळत नाही आहे. आम्ही असे सिनेमे बनवतोय जे सर्वठिकाणी पाहिले जातायत''. किच्चाचं हे वक्तव्य अजय देवगणला खटकलं आणि त्यानं ट्वीट करत उत्तर दिलं होतं,ज्यानंतर तू-तू,मैं-मै,बॉलीवूड विरुद्ध साऊथ असा सिलसिला सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT